श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य देवराव गजभिये यांचा सेवानिवृत्त तर सत्कार कार्यक्रम

 

 

कोरची

स्थानिक श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कोरची येथील प्राचार्य देवराव गजभिये नियत वयोमानाने दिनांक 30 जून 2023 ला निवृत्त झाले. त्यानिमित्त आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा व श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कोरची यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य देवराव गजभिये यांचे सेवानिवृत्ती निमित्त निरोप सत्कार तर नवनियुक्त प्राचार्य शामकुमार सोनुले यांचे स्वागत शाळेचे सभागृहात आयोजित केले होते.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नवनियुक्त प्राचार्य शामकुमार सोनुले तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा सचिव दोषहर फाये, सहसचिव प्राध्यापक नागेश्वर फाये, संस्था सदस्य हुंडीराज फाये, सत्कारमूर्ती निवृत्त प्राचार्य देवराव गजबे यांच्या अर्धांगिनी सौ सुषमा गजभिये, विद्यालयाचे पर्यवेक्षक नंदू गोबाडे हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवी सरस्वती व प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेला पूजन करून झाले त्यानंतर शाळेतील शिक्षक सर्वस्वी महेंद्र बाविस्कर, देवदास हटवार, सत्यवान मेश्राम, यांनी प्राचार्य गजभिये यांच्या विषयी आपले मनोगत व भावना व्यक्त केल्या. तर संस्था सचिव दोषहर फाये यांनी गजभिये सरांच्या तीस वर्षाच्या सेवानिवृत्तीतील कार्यांचा गौरव करून त्यांच्या निवृत्तीनंतरच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य सोनुले यांनी गजबे सरांच्या मार्गदर्शनात शाळेचे सर्व बाबतीत प्रगती झाली आपली शाळा क्रिडेत, शिक्षणात व सांस्कृतिक बाबतीत तालुक्यात अव्वल म्हणून नावारुपास आली. शाळेचा हा दर्जा पुढेही मी कायम ठेवण्याचे आश्वासन याप्रसंगी उपस्थित त्यांना दिले. यावेळी संस्था सचिव प्राध्यापक नागेश फाये, संस्था सदस्य हुंडीराज फाये, यांनी आपल्या मनोगतातुन गजभिये सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक नंदू गोबाडे तर संचालन प्राध्यापक बांगरे, आभार भुसारी यांनी मानले.