कोरची
कोरची येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या एकमेव विश्रामगृहाची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी थांबणाऱ्यांना विविध सोयी सुविधेचा अभाव असल्यामुळे थांबण्याची अडचण निर्माण होत आहे. विश्रामगृहामध्ये दोन रूम असून एका रूमची पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे. या रूममध्ये बाथरूमध्ये पाण्याची सुविधा, बेसिन लिकेज, गिझर बंद, सिलिंग फॅन बंद, स्लॅब क्रॅक, स्लॅब गळती, मेन दरवाजाची काचे फुटलेले, काही दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे विश्राम गृहात पाणी साचले अशा विविध समस्यांच्या अभावामुळे विश्रामगृहात थांबणाऱ्यांना त्रास होत आहे.
या विश्रामगृहाचे मेंटेनन्स पूर्णपणे वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे स्वच्छतेचा अभाव आहे. विश्रामगृह स्वच्छता व देखभाल करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्याकडे कुठलाही प्रकारचे पैसे दिले जात नाही. त्याला साधं पाण्यानी साफसफाई करावी लागते त्यामुळे विश्रामगृहातील स्वच्छता समस्या दूर करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. याठिकाणी सूट घेऊन थांबणारे अधिकारी व कर्मचारीच पैसे खर्च करून आपली व्यवस्था करून घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
सदर विश्रामगृहाचे बांधकाम कोरची येथील जुन्या पंचायत समितीच्या जुन्याच इमारतीमध्ये सन 2016 मध्ये करण्यात आले होते त्यावेळी या विश्रामगृहाचे लोकार्पण गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांनी केला होता. सुरुवातीला या विश्रामगृहामध्ये सर्व सोयीसुविधा अप टू डेट होत्या पण मेंटेनन्स नसल्याने आता पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे.
*कोट*
गडचिरोली जिल्हा परिषद येथील अधिकारीला विश्रामगृहाच्या दुरावस्थाबाबद मागील तीन वर्षापासून अनेकदा अधिकाऱ्यांना तोंडी सांगितले आहे. परंतु अधिकारी कुठलाही प्रकारचे निधी दिले नाही. वरिष्ठ अधिकारी आले तर मलाच खिशातून खर्च करून त्या ठिकाणी व्यवस्था करून द्यावे लागते. सध्या इलेक्ट्रिक बिलही भरलेलं नाही.
बी. सी. धार्मिक
जे. ई. जि. प. बांधकाम
विभाग कोरची.