मणिपूरमध्ये अमानवीय कृत करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या; कोरची तालुका सर्वपक्षीय महिलांची राष्ट्रपतीना निवेदन

 

मणिपूर मध्ये अमानवीय कृत करणाऱ्या सर्व आरोपींना त्वरित अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यासंदर्भात कोरची तालुक्यातील सर्वपक्षीय आदिवासी महिलांनी २७ जुलै गुरुवारी दुपारून कोरची तहसील कार्यालय समोर एकत्रित येऊन मणिपूर येथील अमाविय कृत्याचा विरोध करून तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले आहे.

मणिपूर येथे आदिवासी स्त्रियांवर तेथीलच मानसिक विकृतीचे स्थानिक लोकांनी बलात्कार करून नग्नावस्थेत दिंडी काढण्यात आली व त्यांच्या अब्रूची लक्तरे अक्षरशा वेशीवर टांगून देशाची मान शरमेने खाली झुकवण्यात आली. आपण एक आदिवासी महिला या देशाचे सर्वोच्च पदावर विराजमान आहात आणि आदिवासी महिलांवर अशा प्रकारे घटना घडताना दिसत आहे. देशाला कलंकित करणाऱ्या या घटनेतील आरोपींना त्वरित अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच मणिपूरमध्ये शांती बहाल करावी असे निवेदनात म्हटले आहे.

कोरची नायब तहसीलदार गणेश सोनवानी, अनंत बोदेले यांना निवेदन देताना सर्वपक्षीय महिला संघटन सौ प्रमिलाताई काटेंगे, सौ गिरीजाबाई कोरेटी, कु. ज्योतीताई नैताम, सौ कौशल्य काटेंगे, कुमारी सगुना काटेंगे, समाजसेविका कुमारीबाई जमकातन, नगरसेविका दुर्गा मडावी, कुंतीताई हुपुंडी, शीला सोनकोत्री, बसंती नैताम तसेच तालुक्यातील आदिवासी महिला उपस्थित होत्या.