कोरची शहर नक्षल सप्ताह दरम्यान समिश्र बंद

 

 

 

कोरची

गडचिरोली जिह्यातील संवेदनशील तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरची येथे नक्षल सप्ताह च्या पहिल्याच दिवशी काही प्रमानात बाजारपेठ बंद ठेवण्यात आले. नक्षलवादी यांनी 28 जुलै ते 03 आगस्ट हे सप्ताह नक्षल चळवळीत कार्य करणारे चारू मुजुमदार याचं समरणार्थ दरवर्षी सप्ताह साजरा केला जातो, त्या सप्ताह दरम्यान नक्षल यांचे कडून बंद चे आव्हान केलं जाते.

यामुळे तालुक्यातील काही ठीकानचे बाजारपेठ व किराणा दुकान, भाजीपाला दुकान,शेती काम, तसेच सर्वच मार्केट व कामधदे पूर्णपणे बंद होते. परंतु शासकीय कार्यालये, दवाखाना, बसेस, खाजगी व प्रवासी वाहने, बँका काही प्रमानात दुकाने सुरू होती. सकाळून पोलीस प्रशासनाकडून बाजारपेठ सुरू करण्यात आले होते परंतु काही वेळातच येथिल काही दुकाने बंद करण्यात आले.