कोरची
महसुल विभाग हा शासनाचा कणा असुन प्रत्येक शासकीय योजनेचा प्रत्यक्ष लाभ जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन विवेक साळुंखे, उप विभागीय अधिकारी, कुरखेडा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन केले.
कोरची तहसिल कार्यालय येथे दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी दु.०२.०० वाजता विवेक साळुंखे, उप विभागीय अधिकारी कुरखेडा यांचे अध्यक्षतेखाली तसेच प्रशांत गड्डम, तहसिलदार कोरची, ए. के. बोदेले, नायव तहसिलदार जि.वी. सोनवाणी, नायब तहसिलदार, कोरची तसेच चंद्रशेखर हीडामी, अध्यक्ष, तालुका तलाठी संघटना शाखा कोरची व कोतवाल संघटनेचे अध्यक्ष सुकेलसिंग काटेंगे यांचे उपस्थीतीत महसुल दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ ते दिनांक ०७ ऑगस्ट २०२३ पर्यंत महसुल सप्ताह साजरा करुन त्यामध्ये युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद कार्यक्रम, तालुक्यातील आजी व माजी सैनिकांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे दृष्टीने “सैनिक हो तुमच्यासाठी”, महसुल विभागात काम करणारे आजी व माजी अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबींचे निराकरण करण्यासाठी “महसुली संवर्गातील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी संवाद” व महसुल सप्ताह सांगता समारंभ याप्रमाणे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये तालुक्यातील नागरीकांना विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१ ऑगस्ट महसुल दिनाचे औचित्य साधुन शिधापत्रीका वाटप, उत्पन्नाचे दाखले, संगणीकृत ७/१२, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र व ईतर दाखले मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले. तसेच सन २०२२ – २०२३ या वर्षात उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन संबंधीताचे सत्कार करण्यात आले. तसेच या कार्यालयातुन बदलीने स्थनांतारण झालेले पि.एम. धाईत मंडळ अधिकारी, कोटगुल यांचे शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार प्रशांत गड्डम यांनी केले. सदर कार्यक्रमास तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरीक उपस्थीत होते.