कोरची
कोरची शहरातील मुख्य बाजारपेठेतून अनियंत्रितपणे ट्रक चालवीत जाणाऱ्या छत्तीसगडच्या एका नशेडी ट्रक चालकावर कोरची पोलिसांनी अटक करून ट्रक ताब्यात घेऊन वाहन चालकावर बुधवारी सायंकाळी कारवाई केली आहे.
कोरची शहराच्या मुख्य बाजारपेठ रोडावरून आरोपी ट्रक चालक बिरेंद्र भुवन धनकर (27 वय) रा. डोंगरगड, जि. राजनांदगाव (छत्तीसगड) हा CG 08 B 1196 या क्रमांकाचा रिकामा ट्रक कोरची तहसील ऑफिस टी पॉइंट रोडच्या दिशेने अनियंत्रित निष्काळजीपणाने निघाला होता त्यावेळी शहरातील नागरिक, व्यापारी त्या ट्रक चालकाचे ट्रक चालवणे बघून खूप भयभीत झाले होते. तेव्हा कोरची पोलिसांना मोबाईल फोनवरून माहिती दिली तात्काळ पोलीस त्या ठिकाणी दाखल होऊन त्या ट्रक चालकाला पोलिसानी ट्रकच्या खाली उतरवून त्याला नाव व गाव विचारले तेव्हा तो असभ्यतेणे मोठमोठ्याने ओरडून मै बिरेंद्र भुवन धनकर रा. वॉर्ड न 01, शितला मंदिर पारा लालबाह्हादूर नगर डोंगरगड, जि राजनांदगाव (छ. ग.) असे हिंदीमध्ये सांगितले. तसेच मादक द्रव्य सेवन करून नशेत असल्याचे वाटून आल्याने रिकामी ट्रक व ट्रकचालकाला कारवाई करिता ताब्यात घेतले होते.
कोरची तालुक्यामध्ये सध्या छत्तीसगड वरून महाराष्ट्रातील कोरची मार्गाने चंद्रपूर, हैदराबाद कडे महामार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण खूप वाढलेले आहे त्यामुळे अशा ट्रक चालकावर कोरची पोलिसांकडून झालेल्या कारवाईमुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केला आहे. आरोपी वाहन चालक बिरेंद्र भूवन धनकर याच्या विरोधात कोरची पोलीस स्टेशन येथे कलम 279 IPC सह कलम 185 मोटर वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला कुरखेडा न्यायालयामध्ये गुरुवारी हजर करण्यात आले होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, सहा. पोलीस निरीक्षक गणेश फुलकवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुखदेव कुंभरे हे करीत आहेत.