कोरची
कोरची तालुक्यापासून ४० किलोमीटर अंतरावर येत असलेल्या कोटगुल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ११५ विद्यार्थी असून पाच शिक्षक या शाळेला मजूर पदे असून सध्या तीनच शिक्षक कार्यरत आहे. तर या तीन शिक्षकापैकी एक शिक्षक वैघकीय रजेवर आहे त्यामुळे दोनच शिक्षक विद्यार्थ्यांना कसे सांभाळणार आणि विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देणार त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकासमोर मुलांचे भविष्य कसे घडणार याबाबत खूप चिंता निर्माण झाली आहे.
पालकांनी ही अडचण पत्राद्वारे पंचायत समिती कोरची येथे गटशिक्षण अधिकारी तसेच गट विकास अधिकारी यांच्याकडे दोनदा निवेदना द्वारे केली. परंतु दोनदा निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही २२ ऑगस्ट पर्यंत आश्वासन मिळाले होते मात्र अद्यापही शिक्षकाची नियुक्ती झालेली नाही.
सध्या चालू सत्रात जिल्हा परिषद शाळा कोटगुल येथे एकूण विद्यार्थ्यांची पटसंख्या ११५ असून शिक्षक मात्र तीनच कार्यरत आहेत, एक ते पाच वर्गात विद्यार्थी पटसंख्या ८८ असून शिक्षक एकच आहेत व ते सुद्धा सतत वैद्यकिय रजेवर असतात यावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटगुल येथील शिक्षकांचा म्हणणं आहे की जर एका शिक्षकाची या ठिकाणी नियुक्ती केली तर सांभाळण्यास काही हरकत राहणार नाही.
मुलांच्या भविष्याला घेऊन चिंतेत असलेल्या व संतप्त झालेल्या नागरिकांनी म्हटले की जर मुलांचा प्राथमिक शाळेत जर योग्य शिक्षण मिळाले नाही किंवा भविष्यात त्यांचे पहिले शिक्षण मजबूत राहिले नाही तर त्यांचे नुकसान होईल आम्ही जी काटकसर मुलांच्या शिक्षणासाठी केली ती वाया जाईल याकरिता पालकांनी जिल्हा परिषद शाळेला ताला ठोकण्याचा ईशारा दिला आहे आणि सदर बाबीला वरिष्ठ अधिकारी आणि शासन जबाबदार असणार असेही पालकांनी म्हटले आहे.
कारण काही पालक असे आहेत की ते मोलमजुरी करून शेत मजुरीतून आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण व्हावे व ते भविष्यात ह्या गरिबीच्या परिस्थितीतून बाहेर पडावेत या उद्देशाने आपल्या रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांना शिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु गरिबीमुळे मुलांना कुठे बाहेर शिक्षणाला पाठवण्याची ऐपत नसल्यामुळे त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही त्यामुळे ते आपल्या मुलांना कोटगुल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिक्षण घ्यायला पाठवीत आहेत. यासंदर्भात कोरची येथील गटशिक्षणाधिकारी दास यांना फोनवरून विचारणा केली असता ते म्हणाले की सध्या मी याच्यावर काहीही बोलू शकत नाही मी माहिती पुरेपूर माहिती काढून आपणाला सांगतो.