कोरची सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रस्ते बांधकामातील भ्रष्टाचाराची चौकशी करा; कोरची तालुका आम आदमी पक्ष

 

कोरची
कोरची सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत विविध रस्ते बांधकामांची योग्य रीत्या चौकशी करुण दोषी वर कारवाई करण्यासाठी कोरची तालुका आप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची तहसीलदारा मार्फ़त गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता २८ आगष्ट ला निवेदन पाठविन्यात आले आहें.
निवेदनात कोरची तालुक्यातील काही रोड कामे न करता व काही प्रमाणातच अर्धवट करुण बिलाची पुर्ण रक्कम उचल केली आहे. त्यामध्ये १) डावरी ते पडयालजोव खडीकरण, २) पडयाल जोब ते आंबेखारी, ३) आंबेखारी फाटा ते आंबेखारी खडीकरण, ४) मुरकुटी ते मयालघाट खडीकरण, ५) नवेझरी ते लेकुरवोडी फाटा खडीकरण, 6) लेकुरबोडी फाटा ते चरविदंड टोला खडिकरण, ७) काटेंगे टोला ते लक्ष्मीपूर खडीकरण हया कामाची योग्य ती तपासणी करून ज्या कंत्राट दारांनी असे कृत्य केले व जे अभियंता, उप अभियंता असे बिल सादर करुण भ्रष्टाचार केला त्याच्यावर कारवाई करावी.
जेनेकरून समोर असा भ्रष्टाचार होता कामा नये तसेच या कामाची योग्य ती तपासणी करूण झाल्यावर या कामावरील दुसरे कामांना बनविण्यास परवानगी देण्यात यावी. तसेच काही दिवसापुर्वी करोडो रुपये खर्च करुण नवीन बांधकाम झालेला कोरची ते भिमपूर रस्ता बांधकामापूर्वी जसा होता तसाच दोन महिण्यात झालेला आहे. हया रस्त्याचे जि.एस. वी जे प्रमाण आहे, सीस्टी, फोर्टी ग्रेड वन, ग्रेड दु, एम.पी.एम. डब्लु वि एम कारपेट सिल कोट चे जे प्रमाण मोजमाप पुस्तकी मध्ये जे सादर केले आहे. आणि बिल उचल केली तर हया रस्त्यामध्ये सीस्टी, फोर्टी ग्रेड वन, ग्रेड टु एम.पी.एम. डब्लु वि एम कारपेट कुठे काही प्रमाणात वापरले आहे. तर कुठे फक्त वरचा कोट करूण पुर्ण बिलाची रक्कम उचल केली आहे.
त्यामूळे या सर्व कामांची पूर्णपणे चौकशी करावी जेनेकरुण शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च होऊन सुद्धा काम त्या प्रमाणे झाले नाही. जर हया कामाची योग्य ती तपासणी केली नाही तर समस्त गावकरी व आम आदमी पार्टी यांच्या कडुन पुढे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला आहें. कोरची नायब तहसीलदार गणेश सोनवानी याना निवेदन देताना कोरची तालुका संघटनमंत्री हिरा उईके, कोरची शहर अध्यक्ष धम्मदिप राऊत, युवा तालुका अध्यक्ष गोविंद तांबेकर, सदस्य संजय चौधरी, कुमरे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.