छोटा कुटुंब-सुखी कुटुंब, नियोजन करा अन् निरोगी, सुरक्षित व आनंददायी जीवन जगा; डॉ विनोद मडावी 

 

 

कोरची

छोटा कुटुंब, सुखी कुटुंब, निरोगी सुरक्षित व आनंददायी जीवन जगण्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया (नसबंदी) करणे गरजेचे आहे. तालुक्यातील नागरिकांना कुटुंब नियोजन प्रोत्साहित करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत सावित्रीबाई फुले व माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली जात आहे गत २०२२-२३ या वर्षामध्ये ११३ टक्के तालुक्यात नसबंदी शस्त्रक्रिया झालेली आहे.

कुटुंब नियोजन सर्वांनीच केले पाहिजे म्हणून शासनाकडून आरोग्य विभागामार्फत योजना राबवल्या जात आहेत. कुटुंबात एकट्या स्त्रीवर मातृत्वाचा व देखभालीचा ताण पडतो तसेच जास्त बाळंतपण म्हणजे महिलेवर जास्तीत जास्त शारीरिक व मानसिक ताण, जास्त आजार, पाडणा लांबवणे थांबवणे, दोन्हीही स्त्रिया व मुलांच्या दृष्टीने सुखाचे आहे. कौटुंबिक नियोजन महिलांना बाळाच्या जन्मापूर्वी दरम्यान किंवा नंतर उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आरोग्य धोक्यापासून संरक्षण करण्यास मदत करते यामध्ये उच्च रक्तदाब गर्भधारणा मधुमेह संक्रमण गर्भपात आणि मृत जन्म यांचा समावेश असल्यामुळे कुटुंब नियोजन करणे गरजेचे आहे.

एका कुटूंबानी एक मुलीवर कुटुंब नियोजन केल्यास ५० हजार रुपये तर दोन मुलीवर प्रत्येकी एका मुली मागे २५ हजार रुपये प्रमाणे ५० हजार रुपये माझी कन्या भाग्यश्री व सावित्रीबाई फुले या योजनेअंतर्गत कुटुंब नियोजन केल्यावर त्या कुटुंब धारकाच्या खात्यावर आरोग्य विभाग सदर रक्कम जमा करते. याशिवाय पुरुष शस्त्रक्रिया नसबंदीत १,४५१ रुपये तर स्त्री शस्त्रक्रिया नसबंदीत एस सी, एस टी, बी पी एल अशा धारकांना ६०० रुपये तर इतर धारकांना २५० रुपये मिळतो आहे.

कोरची तालुक्यात २०२२-२३ या वर्षी तालुका आरोग्य विभागाकडून पुरुषांची कुटुंब नियोजनात १०४ तर स्त्रियांच्या कुटुंब नियोजनात २०५ असे एकूण ३०९ जणांची नसबंदी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातून आरोग्य विभागाला २७३ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ची उद्दिष्टे आली होती परंतु त्यापेक्षा अधिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. मागील वर्षी कोरची तालुका आरोग्य विभागाला कुटुंब नियोजनासाठी अंदाजे चार लाख ५० हजार निधी आली असून त्यामधील अंदाजे चार लाख वीस हजार एवढी रक्कम तालुक्यातील कुटुंब नियोजन धारकांना वाटप करण्यात आलेली आहे.

 

आवाहन

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास कुठल्याही प्रकारची शरीरात कमजोरी येत नाही त्यामुळे नागरिकांनी छोटा कुटुंब सुखी कुटुंब ही धारणा मनात ठेवून दोन अपत्य झाल्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घ्यावी.

डॉ. विनोद मडावी

तालुका आरोग्य अधिकारी

कोरची.