कोरची तालुक्यातील चरवीदंड येथील जिल्हा परिषद शाळा तब्बल दोन दिवस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान

कोरची:-
कोरची तालुक्यापासून अंदाजे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या चरवीदंड येथील जिल्हा परिषद शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले याला जबाबदार कोण? चरवीदंड येथील पहिली ते पाचवी पर्यंतची शाळा असून एकूण 14 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत दिनांक 23.10. 2023 ला चरवीदंड येथील शिक्षक यांना भारमुक्त करण्यात आले परंतु त्यानंतर शाळा नियमितपणे सुरू राहावी म्हणून चरविदंड येथील शाळेत एक शिक्षक देणे आवश्यक होते परंतु केंद्रप्रमुख बोटेकसा राजेश परशूरामकर यांच्या निष्काळजी पणामुळे कुठलाही शिक्षकांची शाळेवर प्रतिनियुक्ती करण्यात आली नाही त्यामुळे जिल्हा परिषद शाळा चरवीदंड सलग 25. 10.2023 ते 26.10.2023 पर्यंत शाळा बंद ठेवण्यात आलेली होती यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले त्याला जबाबदार कोण?तसेच 25.10.2023 ला विद्यार्थी तसेच स्वयपाकी मदतनीस पूनारो हलामी हे शाळेमध्ये येऊन बराच वेळ शिक्षक येण्याची वाट बघितले परंतु शिक्षक न आल्याने विद्यार्थी परत गेले सदर 2 दिवस विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात आहे नाही त्यासाठी पालक वर्गाकडून प्रशासनावर रोष व्यक्त करण्यात आलेला आहे. गटशिक्षणाधिकारी अमित दास यांच्याशी फोन द्वारे संवाद साधला असता तेव्हा त्यांनी सांगितले की दिंनाक 25.10.2023 ला बोटेकसा केंद्रातील 14 शाळा ह्या मुख्याध्यापक अधिकारातील सुट्टी होती त्यात चरवीदंड येथील शाळाला पण मुख्याध्यापक अधिकारातील सुट्टी होती असे गटशिक्षणाधिकारी यांनी उत्तर दिले परंतु चरवीदंड येथील शाळेला मुख्याध्यापक अधिकारातील सुट्टी ही 23.10.2023 लाच दिली होती. तसेच कोरची तालुक्यातील किमान 90 टक्के शिक्षक वर्ग हे मुख्यालयी न राहता तसेच स्वतः केंद्रप्रमुख व गटशिक्षणधिकारी हे सुध्दा गडचीरोली,आरमोरी, वडसा,कुरखेडा या ठिकाणाहून दररोज येणे जाने करतात त्याचा अप्रत्यक्ष परिणाम शाळा कार्यालय व शिक्षणावर होत आहेत ही बाब अत्यंत गंभीर आहे. सदर प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी पालकांनी केलेली आहे.