मसेली येथे महिला सशक्तीकरण शिबिरात योजनांच्या लाभासाठी उसळली महिलांची गर्दी

 

 

कोरची

कोरची तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावरील मसेली येथे महिला सशक्तीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शेकडो महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली तसेच विविध योजनांचा लाभ व धनादेशाचे वाटप करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन सरपंच सौ पंचशीला बोगा यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मसेली तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रतापसिंग गजभिये होते. तर कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी गडचिरोली जिल्हा परिषद प्रकल्प संचालक जलजीवन मिशनचे फरेंद्र कुत्तीरकर, कोरची तहसीलदार प्रशांत गड्डम, गटविकास अधिकारी राजेश फाये विशेष अतिथी म्हणून आस्वलहुडकी सरपंच सौ. छाया बोगा, नवेझरी सरपंच सौ सुरेखा आचले, मसेली सरपंच सुनील सयाम, मुरकुटी सरपंच रामदेवाल हलामी, मसेली उपसरपंच वीरेंद्र जांभुळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल केरामी, माजी सभापती नलिनीताई सिद्राम, विद्याताई हिडामी, नायब तहसीलदार गणेश सोनवानी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, पशुधन विकास अधिकारी डॉ. किरण जाधव, पत्रकार राहुल अंबादे प्रेमदास गोटा, राजाराम नैताम आदी उपस्थित होते.

शिबिरात मसेली प्रगती महिला ग्राम संघ यांच्याकडून पाच लाभार्थ्यांना सीधा किट व ब्लॅंकेट वाटप, उमेद कडून शाश्वत उपजीविका निर्माण करणे करता प्रत्येकी ६० हजार रुपयाचे चेक नवेझरी व आंबेखारी येथील सात महिला बचत गटांना वाटप, तसेच मसेली येथील दोन बचत गटांना प्रत्येकी ६० हजार रुपये सीआयएफ धनादेश वाटप, महाराष्ट्र ग्रामीण जीवन ज्योती अभियान उमेद पंचायत समिती कोरची कडून व्यवसायाकरिता २ लाख रुपयाचे लोन संतोषी महिला बचत गट फुलगोंदी यांना ग्रामीण बँक कोरची कडून मंजूर करून चेक वाटप, एकात्मिक बाल विकास कार्यालयकडून ४ महिला लाभार्थ्यांना बेबी किटचे वितरण, तहसील कार्यालय कडून राष्ट्रीय कुटुंब लाभ एक लाभार्थी तसेच श्रावणबाळ योजना एक लाभार्थी व संजय गांधी योजना पाच लाभार्थी इंदिरा गांधी विधवाचे दोन लाभार्थीना लाभ, दुय्यम शिधापत्रिका वाटप करण्यात येऊन पुरवठा विभागामार्फत एकूण वीस योजनांचा लाभ, आरोग्य विभागाकडून सिकलसेल, शुगर, रक्त तपासणी व इतर विविध प्रकारच्या तपासण्या तसेच ३६८ गोल्डन कार्ड, ४८ सिकलसेल कार्ड, ४८ लाभार्थ्यांची डोळे तपासणी, कोरची को-ऑपरेटिव बँक यांच्याकडून ९ लाभार्थ्यांना pmsby योजनांचा लाभ तर सेतू केंद्राकडून ३६ आधार कार्ड नवीन कार्ड बनवून वितरित करण्यात आले.

शिबिरात महसूल विभाग, तालुका कृषी विभाग, पंचायत विभाग, वन विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, भूमी अभिलेख विभाग, आदिवासी विकास विभाग, आरोग्य विभाग, उमेद बचत गट, बँक विभाग तसेच संजय गांधी योजना सेतू व निवडणूक विभागाचे एकूण 21स्टॉल लावून विविध योजनांची जनजागृती करून गरजूंना लाभ दिले. कोरची तालुक्यातील मसेली येथे घेण्यात आलेले हे पहिले शिबिर असून यामध्ये महिला सशसक्तीकरण शिबिराचे लाभ घेण्यासाठी मसेली परिसरातील सावली, राजाटोला, जामणारा, अस्वलहुडकी, दोडके, लक्ष्मीपूर, बोडेना, मुरकुटी, पडयालजोब, मयालघाट, चरवीदंड, लेकरूबोडी, डाबरी, बोंडे, आंबेखारी, फूलगोंदी, बीजेपार, बेलारगोंदी, नवेझरी अशा अतिसंवेदनशील ग्रामीण भागातील पाच ग्रामपंचायतमधील २९ गावातील मोठ्या संख्येने हजारोच्यावर महिला पुरुष शिबिरात उपस्थित होते.

दरम्यान शासकीय विभागाकडून अनेक ग्रामीण भागातील महिला व नागरिकांना योजनांपासून अनेकदा लाभ घेता येत नाही त्यासाठी या शिबिराचा आयोजन शासनाकडून करण्यात आले असून मसेली येथील शिबिरात एकाच छताखाली सर्व विभागातील २१ स्टॉल लावून जनजागृती करून लाभ देण्यात येणार असल्याचे उपस्थित मान्यवरांकडून मार्गदर्शन कण्यात आले तर विविध लोककल्याणकारी योजनेची माहिती सुद्धा देण्यात आले. या शिबिराचे प्रास्ताविक तहसीलदार प्रशांत गड्डम तर आभार मसेली मंडळ अधिकारी एस एस बारसागडे व संचालन कोवे मॅडम यांनी केला.