जूनी पेंशनसह अन्य मागण्याकरीता लढा सूरू राहील आ. सुधाकर अडबाले यांचे प्रतिपादन
कुरखेडा: – येथिल कुथे पाटील विद्यालय गोठणगाव येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ गडचिरोली चे जिल्हास्तरीय अधिवेशन 07जानेवारी 2024 ला संपन्न झाले.
यावेळी ते उदघाटक म्हणुन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ
जिल्हा अधिवेशन माध्यमानेच विधान परिषदेत संधी मिळाली. या अल्पकालावधीत शिक्षकांचा अनेक समस्या मार्गी लावण्यात यश जरी आले असले तरी जूनी पेंशन लागू करने याप्रमूख मागणी सह शिक्षक वर्गाचा अनेक समस्या शासनस्तरावर प्रलंबीत आहेत. या समस्या मार्गी लावण्याकरीता संघटनेच्या माध्यमाने अविरत लढा सूरूच राहील. शिक्षकांनी भक्कमपणे संघटनेचा पाठीशी उभे राहावे असे प्रतिपादन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे राज्य सरकार्यवाह तथा विधान परिषद सदस्य आ. सुधाकर अडबाले यानी केले.
कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार. व्ही. यू डायगव्हाणे होते. यावेळी प्रमूख अतिथी म्हणून सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक योगराज कुथे , जिल्हा संस्थाचालक संघाचे सचिव जयंत येलमूले, विदर्भ ज्यूनिअर कॉलेज टिचर्स एसोसिएशनचे डॉ. अशोक गव्हाणकर, शेमदेव चाफले, तुकाराम शिक्षण संस्थेचे सचिव पि. आर. आकरे, हिरामन पांडव शिक्षण संस्थेचे सचिव अॅड. अजय पांडव, बहुजन हिताय शिक्षण संस्थेचे सचिव कृपाल मेश्राम, जुनी पेंशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरुदेव नवघडे,धनपाल मिसार अध्यक्ष राज्य शिक्षक परिषद प्रा. विजय कूत्तरमारे, काशीनाथ कुंडगीर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विनायक मेश्राम, प्रा. फंडे आदि उपस्थित होते.
अधिवेशनात स्वागताअध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक कुंडलीक बगमारे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना माजी आ. डायगव्हाणे यानी शिक्षकांच्या विविध प्रलंबीत समस्यांचा आढावा घेत संघटना त्या मार्गी लावण्याकरीता सर्वोतोपरी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. अधिवेशनात शिक्षक संघाच्या कॅलेंडरचे प्रकाशन तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हा कार्यकारीणीची नव्याने निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली.
यावेळी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व अहवाल वाचन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, संचालन संचालन योगानंद फरांडे तर आभार शिक्षीका राजश्री कांबळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे तालूका अध्यक्ष लिकेश कोडापे, कार्याध्यक्ष चंद्रकांत नरूले, कार्यवाह रेमाजी बावणे, कोषाध्यक्ष सुधाकर उईके यांच्यासह सर्व कार्यकारणी व सदस्यांनी सहकार्य केले.