कोरची शहरात निघाली श्रीराम प्रतिष्ठान निमित्य भव्य शोभायात्रा
कोरची येथे सर्व व्यापारी यांनी बाजार पेठ बंद करून रँल्लीत सहभागी झाले
कोरची:-
अयोध्यानगरीत २२ जानेवारी प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पाडण्यात आला आहे.यानिमित्ताने आज कोरची शहरातील हनुमान मंदिर बाजार चौक येथे सकाळी 10.00 ते 1.00 वाजेपर्यंत पुजा अर्चना करण्यात आली.दुपारी 1.00 ते 3.00 वाजे पर्यंत भजन,रामायण मोहगांव येथील पार्टीने सादर केले.सायंकाळी 5.00 ते 9.00 वाजे पर्यंत कोरची येथील मुख्य मार्गाने श्रीराम शोभायात्रा विशेष झांकी व धुमाल पार्टीसह संपूर्ण बांजार पेठ बंद ठेवुन कोरचीच्यावतीने सायंकाळी 4.३० वाजता कोरची येथील श्रीराम मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. शहरात काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने कोरची नगरी दुमदुमली.
श्रीराम प्रतिष्ठापणा निमित्य शहरातील कोरची येथील राम मंदिरात भक्तांनी सकाळपासून मोठी गर्दी केली. कोरची शहरात भव्य दिव्य शोभायात्रा निघणार म्हणून महिलांनी आपापल्या घरासमोर सुंदर व मनमोहक रांगोळ्या काढलेल्या होत्या. तसेच शहरातील रामभक्तांनी आपल्या घरावर श्रीरामाची ध्वजपताका व तोरण लावून गुढी उभारल्याने संपूर्ण कोरची शहर भगवामय बनला होता.शहरातील सामाजिक संघटना, मंडळांनी काढलेल्या शोभयात्रेने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या शोभायात्रेत व मिरवणुकीत कोरचीकरांना बघण्यासाठी विविध जिवंत झाक्यां काढण्यात आल्या. यात राम, लक्ष्मण, सीता,हनुमान,वाल्मिक ऋषी, वसिष्ठ ऋषी,भगवान परशुराम,धनुर्धारी राम-लक्ष्मण,उडता हनुमान,राम-लक्ष्मण सीता यांना शरयू नदी पार करून देणारा केवट नाविक,रामायण लिहिताना वाल्मीक ऋषी आदी विविध , झाकिंचा समावेश होता.या मिरवणुकीत सहभागी झालेल्या पुरुषांनी पिवळे वस्त्र व डोक्यावर भगवे फेटे परिधान केली होती, तर स्त्रियांनी पिवळी व भगवी वस्त्र परिधान केलेली होती, तसेच मराठी शाही भगवा फेटा लावून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक संस्कृतीचे दर्शन या शोभयात्रेने घडवून आणले.तसेच या शोभयात्रेत महिलांच्या कलश यात्रेने आणखी रंगत वाढविली. त्यामुळे सर्वत्र वातावरन भगवामय होऊन शोभयात्रेने शहरवासीयांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. “जय श्रीराम ” च्या गजराने श्रीरामाच्या गीताने व ब्यांड, डीजेच्या तालावर, शहरातील तरुणाई थिरकली होती. ढोल, ताशा, मृदंगाच्या गजरात, तालुक्यातील अनेक रामभक्त या शोभायात्रेत सहभागी झाले होते. दिंडी, मृदंग व टाळाचे ठेका धरत श्रीरामाच्या गाण्यावर,भजनावर वारकरी आनंदाने नाचत होते. तर शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनीनि लेझीमच्या तालावर नृत्य केले. सदर मिरवणूक बघण्यासाठी कोरचीकरांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती .या शोभायात्रेत विविध रंगी रोषणाई डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. तर श्रीरामाचे अशवरूड चित्ररथ आकर्षण करणारे होते. या शोभायात्रेत विविध देखावे, फटाक्यांची आतषबाजी यामुळे शोभायात्रा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. यावेळी ‘जय श्रीराम’ च्या जयघोषात शहर दुमदुमले होते..सदर मिरवणूक संपूर्ण शहरात फिरून, समारोप स्थानिक हनुमान मंदीर बाजार चौक श्रीराम मंदिर येथे करण्यातआला. शोभायात्रेत काही अनुचित घटना घडू नये म्हणून कोरची पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. .
शोभायात्रेत आयोजन समितीचे नसरुदीन भामानी भाजपा तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक,
गुडूभाऊ अग्रवाल तथा नगरसेवक ,मनोज अग्रवाल काँग्रेस तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक, डॉ. शैलेंद्र बिसेन नगसेवक, आनंद चौबे, प्रा.देवराव गजभिये, दिलीप मडावी नगसेवक, हिरा राऊत नगरपंचायत उपाध्यक्ष ,कु.दुर्गा मडावी नगसेवक,मेघश्याम जमकातन नगरसेवक, प्रतिभा मडावी नगरसेवक, ,नंदकिशोर वैरागडे, सुरज हेमके, आशीष अग्रवाल,डॉ. नरेश देशमुख, सुभाष धुवारीया, गुरूदेव मेश्राम,गुलाब भैसारे,भोलु पटेल,किरण अग्रवाल,सदरूदीन भामानी, अंकुश चोपकार, किशोर साडील, प्रकाश कौशिक,, लोकमान्य दोनाडकर, राष्ट्रपाल नखाते, विलास ठलाल, संजय बांगरे, हेमंत भुषारी,देविदास हटवार,रवि भानारकर,रमेश नान्ने,अनिल गृप्ता, रविद्र कावळे,भरत खंडेलवाल,विक्की मोहुलेँ,अनिल वाढई, विकास धुवारिया,मधुकर नखाते,आसाराम सांडील,दिगांबर, मुरलीधर रूखमोडे, केशव मोहुरले, जयपाल मोहूर्ले, ,विनायक सलामे,मारोती अंबादे, विलास अंबादे, कृष्णा पडोटी,गोपाल मडावी, सरजुराम जमकातन, अभिजित निंबेकर, गोपाल शेंद्रे,हुकरेजी, नैताम कौशिक,यासहित गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला, शालेय विद्यार्थी, शिक्षकवर्ग, तसेच कोरची शहरातील दुर्गा व गणेश मंडळाचे पदाधिकारी,, हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.