अपघातस्थळी तीन तास पडून होतं दुचाकी स्वराची बॉडी, रुग्णवाहिकातुन दोघाच जखमींना हलविले
कोरची
कोरची शहरातील बायपास महामार्गावरील नवरगावच्या फाट्यापुढे कुरखेडा वरून छत्तीसगडकडे निघालेल्या अज्ञात मालवाहू ट्रकनी विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीस्वारास एका बाजूनं धडक दिल्यामुळे दुचाकी चालक रस्याच्या कडेला जाऊन पडले यामध्ये दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेली दोघे जण गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजता दरम्यान घडली आहे. अज्ञात मालवाहू ट्रक दुचाकी क्रमांक MH 33 AB 8324 ला धडक देऊन घटनास्थळावरून पसार झालेला आहे.
मृतक रुपेश गांगसाय नैताम वय २७ वर्ष रा. चांदागोटा तालुका कोरची असे युवकाचा नाव आहे. तर मिनाबाई नीलाराम कल्लो वय ५० वर्षे व महेश निलाराम कल्लो वय २५ वर्ष रा. नवरगाव तालुका कोरची हे दोघेही नात्यात माय-लेक असून गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मिनाबाईच्या डोक्याला गंभीर दुखापत असून महेशच्या उजव्या पायाला मार लागल्यामुळे दोघांना सुरुवातीला कोरची ग्रामीण रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकानी नेण्यात आले येथील वैघकीय अधिकारी डॉक्टर आशिष विटणकर यांनी प्राथमिक उपचार करून डोक्याला गंभीर दुखापत असल्यामुळे या दोघांना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्ह्या सामान्य रुग्णालयात रेफर केला आहे.
विशेष म्हणजे 108 रुग्णवाहिका घटनास्थळी येऊन सुद्धा रुग्णवाहिकेत दोघाच जखमींना कोरची ग्रामीण रुग्णालयात हलविले परंतु मृतक रुपेश नैताम याला रस्त्यावरच सोडून दिले होते. या बायपास महामार्गावर अनेक जड वाहनांची वर्दळ सुरू होती एखादी वाहन अंगावरून जाऊन पूर्ण बॉडी छिन्न भिन्न होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती अशा वेळी नातेवाईकांना याची माहिती झाली ते घटनास्थळी उपस्थित झाले त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं मृतक रुपेश नैताम याला ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका पाठवा म्हणून फोनवरून कोरची ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरला विनंती केली परंतु येथील डॉक्टर व वैघकीय अधीक्षक यांनी तीन तास लोटून सुद्धा १०२ रुग्णवाहिका पाठविली नाही रुग्णवाहिका का पाठवली नाही याचे कारण डॉक्टरला विचारले असता त्यांनी सांगितले की रुग्णवाहिकेचा वाहनचालक उपस्थित नव्हता आणि उपस्थित झाला तेव्हा जाण्यास तयार नव्हता माझ्याशीच अरे रावी केली असल्याचे डॉ आशिष विटनकर यांनी सांगितले त्यामुळे रुग्णवाहिका घटनास्थळी वेळेत पोहोचू शकली नाही आणि अपघातात मृत्यू पावलेल्या रुपेशची बॉडी रस्त्यावरच तीन तास पडून होती.
यानंतर मृतकाच्या नातेवाईकांनी कोरची येथील माजी नगराध्यक्ष नसरुद्दीन भामानी यांना घटनेची माहिती दिली घटनास्थळी अनेक नागरिक व नातेवाईक उपस्थित होते आणि आरोग्य यंत्रणा विरोधात रोष व्यक्त करत होते परंतु वाहन नसल्यामुळे मृतकाची बॉडी घेऊन जाऊ शकत नव्हते तेव्हा माजी नगराध्यक्ष यांनी नगरपंचायतची स्वर्गरथ बोलावून त्यामध्ये मृतक रुपेश नैताम याला टाकून ग्रामीण रुग्णालय येथे आनले. मृतकांच्या नातेवाईकांनी वेळेवर रुग्णवाहिका पोहोचली नसल्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांविरोधात ग्रामीण रुग्णालयात रोष व्यक्त केला.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातीलच झगडवाही गावात मृतक रुपेश नैताम चांदागोटा गावाहून दुचाकीने नातलगाच्या लग्न समारंभात गेला होता तिथे त्याला नवरगावचे त्याचे नातेवाईक मिनाबाई कल्लो, महेश कल्लो हे दोघेजण मिळाले तेव्हा त्यांनी रुपेशला मोटरसायकलने नवरगावला परत सोडून द्यायला सांगितले तेव्हा रुपेश त्यांना सोडून देण्यासाठी कोरचीला पोहोचला आणि कोरचीवरून एक किलोमीटर अंतराच्या नवरगावी पोहचण्याआधीच अज्ञात ट्रकच्या धडकेमध्ये मृत्यू झालं आहे. रुपेशचे वडील काही वर्षा आधीच वारले त्यामुळे रुपेश हा शेती करून घरातील सर्व जबाबदारी सांभाळत होता घरातील कर्ता मुलाच्या अपघाती निधनामुळे आई व भावांवर दुःखच डोंगर कोसळल आहे. या अपघातानंतर कोरची पोलिस स्टेशन येथे अपघाताची नोंद झाली असून मोटरसायकल जप्त केलेली आहे तसेच अज्ञात मालवाहू ट्रकचा शोध सुरू असून पुढील तपास कोरची पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार करीत आहेत.