मद्यधुंद दुचाकीस्वाराचे पायदळ घरी जाणाऱ्या महिलांना जोरदार धडक

चार महिला व एक युवक गंभीर जखमी; गंभीर जखमींना प्राथमिक उपचारानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर

कोरची
कोरची तालुक्यातील आदिवासी कवर समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहुन परतीच्यावेळी प्रवास करित मोहगाँव- कोरची राष्ट्रीय महामार्गावरून पायदळ घरी जात असलेल्या चार महिलांना याच विवाहसोहळात आलेल्या छत्तीसगड राज्यातील बजरंगपुर छुरीया येथील मद्यधुंद चार युवक एकाच मोटारसायकलने दिलेल्या धडकेत दोन महिलां गंभीर जखमी झाल्या यात दोन महिलांचे पाय टूटले असून मोटारसायकल चालकाच्या डोक्याला गंभीर मार लागले असून दोघे युवक गंभीर जखमी झाल्याची घटना ११ मार्च शनिवारीच्या रात्रों ९ वाजता दरम्यान घडली आहे.
कोरची वरून दोन किमी अंतरावर असलेल्या मोहगाव येथे आदिवासी कवर समाज व सेवा संस्था खडकाघाट सोहले परिक्षेत्र कोरचीच्या वतीने सामूहिक आदर्श विवाह सोहळा ११ मार्चला संपन्न झाले याच विवाहसोहळात खुनारा येथील कुमारीनबाई आंनदराम जुडा (५५), नर्मदा राजकुमार करशी (५०), सुमन दसरथ करशी (५०), सुलोचना मनकुमार बखर (५२), ह्या राष्ट्रीय महामार्ग कोरची कुरखेडा मार्गावरून पायदळ प्रवास करीत होत्या कोरची येथील झाडुराम मेश्राम यांच्या शेताजवळ याच विवाहसोहळात छत्तीसगड राज्यातील बजरंगपुर छुरीया येथील युवक मित्राच्या लग्नाला आले होते ते मद्यधुंद अवस्थेत सुसाट वेगाने मोहगाव वरून एकाच मोटार सायकल वरती चार युवक बजरंगपुरला जात असताना या चारही महिलांना मोटरसायकल क्रमांक CG 08 AV 9446 नी जोरदार धडक दिली यावेळी दुचाकी चालकाने हेल्मेट घातले नव्हते. तर या धडकेतील चारही महिला गंभीर जखमी झाल्या यांच्यावर कोरची ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ अभय थुल, डॉ आशिष इटनकर यांनी प्राथमिक उपचार करून गडचिरोली येथील सामान्य ग्रामीण रुग्णालयामध्ये रेफर करण्यात आलेले असुन मोटार सायकल चालक कुमेश कुंजाम हा गंभीर जखमी असून विनोद उईके, सुशील कुंजाम, बिरजू चंद्रवंशी हे तीघेही किरकोळ जखमी झाले आहेत या सर्व अपघात ग्रस्तांना गडचिरोली येथे उपचार सुरु आहेत.
सदर उपघात झाल्यावर कोरची येथिल नागरिक व कुरखेड्यावरून कोरचीला येत असलेले पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोड यांनी प्रवासी नागरीकांच्या सहकार्याने तत्काळ १०८ रुग्णवाहीका बोलावून ज़ख़मीना स्थानिक नागरीकांच्या मदतीने कोरची रुग्णालयात दाखल करन्यात आले. सदर घटनेची नोंद कोरची पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलीस निरीक्षक अमोल फळतरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश फुलकवर अधिक तपास करीत आहेत.