आरमोरी नगरातील मुलभूत समस्या ताबडतोब नीकाली काढण्यासाठी दिनांक ६ मार्च २०२३ ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या नेतृत्वात नगर परीषद व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु आठवडा होवुन कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे येत्या १५ मार्च पासुन उपोषणाला बसणार असा इशारा आयोजित पत्रकार परीषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या तालुका शाखेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी पत्रकार परीषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष संदीप ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील नंदनवार, शहर अध्यक्ष अमिन लालानी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन लांचेवार , राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा ज्योती सोनकुसरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा ज्योती घुटके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिवाकर गराडे, , प्रफुल राचमलवार,
उपस्थित होते.
निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या होत्या आरमोरी नगरपरिषद कार्यक्षेत्रात असणाऱ्या अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे. सर्व गोरगरीब जनतेचे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर असलेले घरकुल बांधकाम सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. ज्या घरकुल लाभार्थींचे बांधकाम पुर्ण झाले त्या लाभार्थींच्या बँक खात्यात त्वरीत अनुदान जमा करावे. नगरातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी दररोज मुबलक प्रमाणात पुरविण्यात यावी. नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. आरमोरी नगरपरिषद अंतर्गत स्वच्छता कंत्राट देण्यात आले आहे. परंतू सदर कंत्राटदार हा संपुर्ण शहराची स्वच्छता करीत नसल्याने संबंधित कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकून संपूर्ण धनादेश थांबविण्यात यावे. नगराची स्वच्छता न करता स्वच्छतेचे धनादेश कंत्राटदाराला देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्यांचे शेवटचे बांधकाम पुर्ण झाले आहे त्यांना बांधकामाचे पुर्ण अनुदान अदा करण्यात यावा.
या समस्यांचे एका आठवडाभरात निराकरण करण्यास नगर परीषद व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते . परंतु वरील कोणत्याही मागण्या मान्य न झाल्या मुळे नगरपरिषद कार्यालयासमोर समोर उपोषण करण्याचा इशारा आयोजित पत्रकार परीषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या तालुका शाखेच्या वतीने देण्यात आला आहे.