तहसीलदार सोमनाथ माळी, एस डी पी ओ साहिल झरकर यांनी आंदोलन मागे घेण्याची केली विनती
कोरची
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर तसेच महाराष्ट्राच्या सुद्धा शेवटच्या टोकावर छत्तीसगड सीमेलगत असलेला आदिवासीबहुल नक्षलग्रस्त तालुका म्हणजे कोरची आहें. मागील तीन वर्षापासून कोरची तालुक्यात विजेची समस्या तालुक्यातील जनतेसाठी डोकेदुखी ठरत असल्यामुळे या समस्येच्या निराकरणासाठी तालुक्यातील सर्व पक्ष हे एकजुटीने झंकारगोंदी फाट्यावर 12 एप्रिल पासून बेमुदत चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे निवेदन १० एप्रिलला तहसीलदार यांना देण्यात आले.
आज सकाळ १० वाजता पासुन सुरू चक्का जाम हा सायकाळला गड़चिरोली कार्यकारी अभियंता संजय डोंगरवार यांनी लिखित आश्वासन दिल्या नंतर आंदोलन मागे घेन्यात आले. त्यापूर्वी झंकारगोंदी फाट्यावर कोरची तालुका सर्व पक्षीय पदाधिकारी व गावकरी लोकांचे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम सुरू होते. यावेळी कोरची तहसीलदार सोमनाथ माळी व कोरची विद्युत विभागाचे अधिकारी सुमित वांढरे, सहा अभियंता प्रफुल कुडसंगे यांनी आंदोलन स्थळी भेट दिले आणि आंदोलन मागे घेण्यासाठी सांगितले परंतु लिखित दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असे स्पष्टपणे आंदोलनकर्त्यानी सांगितले. प्रसंगी रस्त्यावरून ट्रक व वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या वाहतूक ठप्प झाले होते परंतु 108 रुग्णवाहीका, बॅकची कॉश वाहन, व इमर्जन्सी सेवा वाहनांना सोडण्यात आले. घटनास्थळी कुरखेडा अपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर, कोरची पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, बेडगाव पोउपनि प्रबोधन जोंधडे, पोउपनि अमोल गुरुपवार उपस्थित असुन अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसाचा चोख बंदोबस्त ठेवला होता.
लिखित आश्वासन घेताना सर्वपक्षीय आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रतापसिंह गजभिये, उपाध्यक्ष नसरुद्दीन भामानी, आनंद चौबे, मनोज अग्रवाल, संघटक सियाराम हलामी, संचालन प्राचार्य देवराव गजभिये, , हकीमुद्दीन शेख, सदरुद्दिन भामानी, आनंद चौबे, डॉ. शैलेंद्र बिसेन सौ. हर्षलता भैसारे, सौ. कुमारीताई जमकातन, दुर्गा मडावी, प्रमिताई काटेंगे,. देवराव गजभिये, रामसुराम काटेंगे, राकेश मोहुर्ले, राहुल अंबादे, सुरज हेमके, धनीराम हीडामी, झाडूराम सलामे, राजेश नैताम, अशोक गावतुरे,संतोष मोहूर्ले,कृष्णा वंजारी, चेतन कराडे, घनश्याम अग्रवाल, आशिष अग्रवाल, वसीम शेख, सदाराम नुरुटी, अनिल केरामी, धनिराम हिडामी, गंगासाय मडावी, कृष्णाजी कावळे, शंकर शाहु, डी.पी.केरामी सरपंच विलास होळी,जीतेंद्र सहारे,सुधाकर हिलामी, सौ.सुनिता मडावी सरपंच रुपराम देवांगन, कु.मंजुषा कुमरे सरपं, अनिल जनबंधु उपसरपंच, राहुल मलगाम सरपंच, किशोर नरोटे सरपंच, सावजी बोगा सरपंच, मदन कोल्हे सरपंच, रविता हलामी सरपंच, विजय हिडामी सरपंच, छत्रपत्ती बांगरे, नाशिक नागमोती, यंशवत वाळदे, मेघश्याम जमकातन, गोविंद दरवडे, हिराभाऊ राऊत, शामकुमार यादव, महिला पुरुष बहुसंख्यत उपस्थित होते.