कोरची
कोरची तालुक्यात कोरोना (कोविड-१९) विषाणूने एकदा परत शिरकाव केलेला असून कोरची तालुक्यात 5 रुग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आल्यामुळे पुन्हा सतर्क राहण्याची आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. सध्या काही रुग्णांना सर्दी, खोकला व घशाचा त्रास होत असल्यामुळे त्यांची ग्रामीण रुग्णालय कोरची येथून आरटीपीसीआर तपासणी करिता सॅम्पल गडचिरोली येथे पाठवण्यात आले होते. 9 तारखेला पाठवण्यात आलेल्या 26 सँपल पैकी दोन व 10 तारखेला पाठवण्यात आलेल्या 12 स्याम्पल पैकी तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालय कोरची येथील लॅब टेक्निशियन यांनी दिली. परंतु वैद्यकीय अधीक्षक यांना विचारणा केली असता त्यांना याबाबत माहिती नसल्याचे दिसून आले त्यांनी फक्त दोनच रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. तालुक्यात परत कोरोना विषाणूंनी शिरकाव केल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचे आव्हान करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांची प्रकृती चांगली असून त्यांना होम कॉरंटाईन मध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.