कोरची
कोरची तालुक्यातील बस फेऱ्या तात्काळ सुरू करण्याबाबत विभागीय व्यवस्थापक अधिकारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ गडचिरोली यांना माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल तुलाराम केरामी यांनी निवेदनातून मागणी केली आहे.
निवेदनात, कोरची तालुका आदिवासी बहुल व भौगोलिक दृष्ट्या अतिदुर्गम असून येथे दळणवळणाच्या पुरेशा सेवा उपलब्ध नाही. या तालुक्यातील नागरिकांना केवळ महामंडळाच्या बसेस व अवलंबून राहावे लागते नागरिकांना विविध शासकीय कार्यालयातील कामकाजाकरिता तालुका जिल्हा मुख्यालयाला ये-जा करावे लागतो. परंतु पुरेशा बस फेऱ्या नसल्यामुळे नागरिकांना आपले कार्यालयीन कामे आटपून स्वगावी परतण्याकरिता कोणतेही साधन नसल्यामुळे नाईलाजास्तव जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी मुक्कामी राहावे लागतो. परिणामी नागरिकांचा वेळ व पैसा खर्च होतो तसेच पुरेशा बस फेऱ्या उपलब्ध नसल्यामुळे बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागतो.
शासनाने अलीकडेच महिला प्रवाशांना 50% टक्के सुटवर बस प्रवास करण्याकरिता योजना सुरू केलेली आहे परंतु पुरेशा बस फेऱ्या अभावी महिला प्रवासी सदर योजनेपासून वंचित आहेत कोरची तालुका गडचिरोली जिल्ह्यात येत असून सुद्धा गडचिरोली आगाराची फक्त एकच बस फेरी सुरू आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे त्यामुळे ब्रह्मपुरी-कोरची-गोंदिया सकाळ सायंकाळ, गडचिरोली-कोरची-कोटरा-मसेली हलटींग, गडचिरोली- कोरची-साकोली हलटिंग, गडचिरोली-कोटगुल हलटिग, गडचिरोली-कोरची -बेतकाठी बोटेकसा हलटिंग या बस फेऱ्या त्वरित सुरू करावा असे या निवेदनात म्हटले आहे. गडचिरोली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ विभागीय व्यवस्थापक अधिकारी यांना निवेदन देताना माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल केरामी, मसली सरपंच सुनील सयाम, उपसरपंच वीरू जांभुळकर, मसेली येथील सिद्राम साहेब, पडियालजोबचे पोरेटी, कोटरा गुलाब मडावी उपस्थित होते.