कोरची
कोरची शहरातील तहसील ऑफिस रोड कडे जात असताना अचानक एका चहा टपरीवर आग लागण्याची आरडा-ओरड ऐकताच पोलीस उपनिरीक्षक थांबले व बघितले आणि हिम्मत बाळगून त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी यांनी शेजारच्या भाजीपाले दुकानदार लोकांना पोता मागून त्यात पोत्याला ओला करून त्या गॅस सिलेंडरवर टाकला त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
कोरची शहरातून तहसील ऑफिस मार्गावरील डॉक्टर नंदकिशोर शेंडे यांच्या घरासमोर असलेलं ताराचंद झुमक पुराम यांच्या चहा टपरीवर गॅस ला माचीस काळी पेटवताच अचानक गॅस सिलेंडर परिसरात मोठं पेट घेतलं यावेळी दुकानातून ताराचंद व आज आठवळी बाजार असल्याने परिसरात भाजीपाला खरीदी करणारे लोक दूर पडाले. आजू बाजूचे दुकानदार दुकानाचे शटर बंद करून आतमध्ये गेले होते. दोन-तीन दिवसापासून गॅस लिक होत असून गॅस ची सतत वास येत असल्याचे ताराचंद यांना जाणीव होती त्यांनी रेग्युलेटर सुद्धा चेक केला होता काही वेळा नंतर गॅस ची वास बंद झाल्याने त्यांनी दुर्लक्ष केलं होत परंतु आज दुपारी 3 वाजता दरम्यान ग्राहकांना चहा बनवण्यासाठी गेले असता त्यांनी माचीस पेटवली तेव्हा आगीचा लोट घेतला.
सुदैवाने जीवित हानी टळली व गॅस चे स्फोट झाले नाही कारण या मार्गाने पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी आठवळी बाजारात भाजीपाला विकत घेत असल्याने त्यांनी ते बघितले पटकन त्यांनी हिम्मत बाळगून शेजारी भाजीपाला दुकानदार लोकांना पोता मागून तो ओला करून पटकन त्या गॅसवर टाकून गॅसची बटन ऑफ केली यावेळी शेजारी असलेले निरंकारी जनरल स्टोर्स दुकानदार मुकेश निनावे व हमीदखा पठाण यांनी मदतीला धावून सहकार्य केला. परिसरातील नागरिकाकडून पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी व सहकार्य करणाऱ्या लोकांचं कौतुक केला जात आहे.