वन्यजीव शिकार प्रकरणातील फरार आरोपीला कोरची तालुक्यातील सोनपूर गावातून अटक

 

 

कोरची

दीड महिन्यापासून वन्यजीव शिकार प्रकरणातील बाप लेक आरोपी मुरलीधर हरबाजी गायकवाड(६४), मुलगा अतुल मुरलीधर गायकवाड (३३) रा. शिवणी ता. शिंदेवाही, जि चंद्रपूर यांना कोरची तालुक्यातील सोनपूर गावातून शुक्रवारी सायंकाळी चार वाजता दरम्यान वन अधिकाऱ्यांनी मोबाईल ट्रॅक लोकेशन वरून अटक केलं आहे.

आरोपीने काळा जादू करण्यासाठी वन्यप्राणीचे शिकार केले असल्याची माहिती शिवणी वनपरिक्षेत्र येथील अधिकारी बी के तुपे यांना गोपनीय माहिती मिळाली होती यावरून त्यांनी आपल्या पथकासह ३ एप्रिल २०२३ रोजी आरोपीच्या शेतशिवारात व घरी पंचा सह समक्ष पाहणी केली असता वन्यप्राण्यांची हाडे ( अवशेष ) आढळुन आले त्यानुसार वन्यप्राणांची हाळे जप्त करून भारतीय वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्हा दाखल होण्याची माहिती आरोपीला लागताच तो फरार झाला होता.

दीड महिन्यानंतर फरार आरोपीचे मोबाईल लोकेशन कोरची तालुक्यातील सोनपूर गावात सुरू झाल्याचे माहिती शिवणी वनपरिक्षेत्र अधिकारी बी के तुपे यांना मिळाली यांनीं आपल्या क्षेत्र सहायक एस वाय बुल्ले, वनरक्षक एल के मेश्राम, ए डब्लू गायकवाड, एस जी चाहदे या पथकासह वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहा वनसंरक्षक मनोज चौहान, यांच्या मार्गदर्शनाखाली बेडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी एल एम ठाकरे क्षेत्र सहायक संजय राठोड, वनरक्षक प्रकाश मगरे, विलास रंनदये यांनी सापळा रचून कोरची पासून सहा किमी अंतरावर असलेल्या सोनपूर गावातील प्रकाश रामसू बोगा यांच्या घरून अटक करण्यात आली. आरोपी यांना शिवणी वनपरिक्षेत्र अधिकारी तुपे पुढील कार्यवाही करिता ताब्यात घेतले आहे.