कोरचीच्या व्यापारीचे मध्यप्रदेशातील सावनेर-बैतुल राष्ट्रीयमहामार्गावर अपघात; भरधाव कारपुढे अचानक जंगली डुक्कर आल्याने धडकेत कार उलटली तर एक गंभीर

 

कोरचीतील निर्मल टी पॉईंट चे मालक निर्मल धामगाये यांचे मध्य प्रदेशातील सावनेर-बैतूल राष्ट्रीय महामार्गावर कारने सोमवारी रात्रोदरम्यान अपघात झाले. CG 07 MB 15 65 क्रमांकाची रिड्स कारने मध्यप्रदेशातील छिंदवाडावरून कोरचीला परत येत असताना सावनेर जवळ अचानक जंगली डुक्कर पुढे आल्याने कारची धडक डुकरावर बसली यामध्ये जंगली डुक्कर जागीच ठार झाला तर कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.
यामध्ये व्यापारी निर्मल धमगाये (५०) रा. कोरची यांना किरकोड जखम झाली असून यांच्यासोबत असलेले यांचे साडेभाऊ आनंद टेंभूरकर (५३) रा. डोंगरगढ (छत्तीसगड) हे गंभीर जखमी झाले आहेत. यांच्या छातीची फसलीमधील पाच ठिकाणची हड्डी तुटली असून त्यांच्यावर नागपूर येथील खाजगी सुअरटेक दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
निर्मल धमगाये या व्यापाराची सासुरवाडी छत्तीसगड राज्यातील डोंगरगढ येथील आहे आपल्या साडु आंनद टेभुरकर यांच्या मुलासाठी मुलगी बघण्यासाठी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे गेले होते मुलगी बघून झाल्यानंतर परत येत असताना सदर अपघात घडले आहे. सदर अपघातामध्ये कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला असून कार पूर्णपणे भंगार झालेली आहे.