कोरची ग्रामीण रुग्णालयात चार दिवसीय वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिर

 

 

नागरिकांनी महाआरोग्य शिबिरातचे लाभ घ्यावे: डॉ. अभय थुल वैद्यकीय अधीक्षक यांचे आवाहन

 

कोरची

राष्ट्रीय आरोग्य अभियान व ग्रामीण रुग्णालय कोरची यांचे संयुक्त विद्यमाने आदिवासी भागातील रुग्णांना विशेष तज्ञांच्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी चार दिवसीय महा भव्य निशुल्क आरोग्य व दंत शिबिराचे आयोजन केले आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी या महाआरोग्य शिबिरामध्ये आपल्या आरोग्याची तपासणी करून घेण्यासाठी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभय थुल यांनी नागरिकाना आवाहन केला आहे.

दिनांक 18 जानेवारी 2024 ला वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे उद्घाटन समारोह, रुग्ण नोंदणी तपासणी पश्चात रुग्ण भरती तसेच दिव्यांग तपासणी, दिनांक 19 जानेवारी 2024 ला तपासणी व शस्त्रक्रिया, कॉल्पोस्कोप तपासणी (गर्भाशय कर्करोग तपासणी), मॅमोग्राफी (स्तनांचे कर्करोगाची तपासणी) दिनांक 20 जानेवारी 2024 ला कुटुंब नियोजन पुरुष नसबंदी तसेच इतर शस्त्रक्रिया व शस्त्रक्रिया पश्चात काळजी, दिनांक 21 जानेवारी 2024 तपासणी व शस्त्रक्रिया अशा चार दिवसीय महाआरोग्य शिबिरात दंतरोग चिकित्सा व उपचार, डोळ्यांची तपासणी व मोतीबिंदूचे ऑपरेशन, कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब व पक्षघात व इतर आजारांचे निदान व उपचार, स्त्री रोग तपासणी व उपचार, तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व सल्ला मिळणार आहे त्यामुळे या शिबिरात बहू संख्येने नागरिक उपस्थित राहून आपल्या आरोग्याची तपासणी करून घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ विनोद मडावी यांनी सुद्धा आवाहन केले आहे.

या चार दिवसीय शिबिराचे उद्घाटक आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे हे राहणार आहेत तर अध्यक्ष नगरपंचायत नगराध्यक्ष श्रीमती हर्षलता भैसारे ह्या राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद गडचिरोली मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह, कुरखेडा उपविभागीय अधिकारी विवेक साळुंके, गडचिरोली शासकीय रुग्णालय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, गडचिरोली जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डावल साळवे, गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) तथा नोडल अधिकारी डॉ. बागराज धुर्वे, कोरची तहसीलदार प्रशांत गड्डम, पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेश फाये आवर्जून उपस्थित राहणार आहेत.