दुचाकीला खाट बांधुन मृतदेहाची वाहतुक हाच जिल्ह्याचा विकास का साहेब?

 

 

माजी मंञी विजय वडेट्टीवार यांची सभागृह दहाड

 

आमदार वडेट्टीवारांचा गडचिरोली जिव्हाळा कायम

 

देसाईगंज-

भामरागड तालुक्यातील कृष्णार येथील आदिवासी युवक गणेश तेलामी (२३वर्ष) याचा नुकताच हेमलकसा येथील रुग्णालयात क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. माञ मृत्युनंतर मयताचा शव गावापर्यंत नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध होऊ न शकल्याने नातेवाईकांना मृतदेह चक्क दुचाकिला खाट बांधुन गावापर्यंत नेण्याचा संतापजनक प्रकार समाज माध्यमातून चव्हाटय़ावर येताच माजी मंञी तथा विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांनी हाच का जिल्हाचा विकास का साहेब?असा प्रश्न सभागृह उपस्थित करून गडचिरोली जिल्ह्याचा मुळचा रहिवासी असल्याचा जिव्हाळा अद्यापही कायम असल्याने गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केल्याचा ढोल पिटणाऱ्यांचे चांगलेच काण टोचले आहेत.

गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, अतिसंवेदनशील व डोंगराळ भागात वसलेला असुन बहुतांशी नागरिक याच भागात वास्तव्यास आहेत.जिल्ह्यातील कित्येक गावे अद्यापही पक्क्या रस्त्यांनी जोडले गेले नसुन आवागमनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.अशातच आरोग्य विभागाची स्थिती खस्ता असुन अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात डाॅक्टर नाहीत की यथायोग्य स्थितीत रुग्णवाहीका,शववाहिका उपलब्ध नाहीत.

अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आलेल्या रुग्णवाहिका ह्या फक्त गरोदर मातांसाठी असल्याचे सबब पुढे करण्यात येत असून अनेक दवाखान्यातील रुग्णवाहिकांची स्थिती अतिशय जरजर असुन कालबाह्य झालेल्या आहेत.शववाहिका उपलब्ध होत नसल्याने दवाखान्यात मृत्यू झाल्यास मृतदेह न्यायचा कसा असा गंभीर प्रश्न गेली कित्येक वर्षांपासून सातत्याने उपस्थित करण्यात येत असला तरी स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतरही प्राथमिक आरोग्य केंद्रापासून कित्येक किलोमीटर अंतरावर गाव असलेल्या नागरीकांना शववाहिका उपलब्ध होऊ नये?यालाच विकास म्हणायचा का साहेब?असा मन हेलावून सोडणारा गंभीर प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केला आहे.

मागील पाच वर्षे तत्कालीन सत्तेत असलेले माजी मुख्यमंञी व विद्यमान उपमुख्यमंञी तसेच विद्यमान मुख्यमंञ्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंञीपद भुषवले आहे.तसेच गडचिरोली जिल्ह्यात विद्यमान दोन आमदार व वर्तमान कॅबिनेट मंञी सत्ताधारी पक्षाचे आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातिल नागरीकांची इत्यंभूत स्थिती यांना माहित असुन गेली कित्येक वर्षांपासून येथील नागरीकांना आरोग्य संदर्भ सेवेसाठी पायपीट करावी लागत असल्याचे धक्कादायक वास्तव सर्वांना माहित आहे. असे असताना जिल्ह्यात केवळ सिसी रोड,नाली बांधकाम व समाज मंदिरांचे बांधकाम करण्यापलिकडे गंभीर होत चाललेला शिक्षण, आरोग्य या प्रश्नावर चकारही बोलुन जिल्ह्यातिल नागरीकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी जिल्ह्याच्या समस्या सभागृहाच्या निदर्शनास आणून देऊ नये,यावरून संबंधित लोकप्रतिनिधी जिल्ह्याच्या विकासाप्रती किती संवेदनशील असल्याचा हा पुरावा असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

दरम्यान भामरागड तालुक्यातील कृष्णार येथील २३ वर्षीय युवकाचा मृतदेह दुचाकीवर खाट बांधुन खाटेवर गावापर्यंत नेल्यानंतर सक्रिय झालेल्या आरोग्य विभागाने त्याच्या गावापर्यंत शववाहिका पाठवून प्रकरणावर पांघरूण घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर येऊ लागला आहे.मुळात क्षयरोग निर्मुलनासाठी शासनातर्फे विभागा अंतग॔त विशेष मोहीम राबविण्यात येत असून यावर कोट्यावधीचा निधी खर्च करण्यात येत असल्याचे दाखविण्यात येत आहे.माञ संबंधित मृत युवक मागील सहा महिण्यांपासुन क्षयरोगाने ग्रस्त असताना आरोग्य विभाग झोपेत होते काय?अतिदुर्गम, अतिसंवेदनशील भागात शासनाची आरोग्य सेवा यथायोग्य पोहचते काय?याबाबत सखोल चौकशी करून या घटनेस आरोग्य विभागाचे अधिकारी देखील तेवढेच जबाबदार असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आमदार मागणी करत विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले असले तरी घडलेल्या घटनेतुन बोध घेऊन जिल्ह्यात आरोग्य यंञणा अधिक सक्रिय करण्यासाठी शासकीय स्तरावरुन यथायोग्य उपाययोजना करण्यात येतील काय?असा निरुत्तरीत प्रश्न माञ अद्यापही कायम आहे.