अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी कोरची तहसील येथे शासकीय विकास कामांचा घेतला आढावा

 

 

कोरची

गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर टोकावरील अतिदुर्गम नक्षलग्रस्त छत्तीसगड राज्य व गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या कोरची येथे महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी बुधवारला कोरची तहसील कार्यालयातील सभागृहात शासकीय विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार हरीराम वरखडे, (अजित पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवी वासेकर, युवा जिल्हाध्यक्ष लीलाधर भरटकर, माजी कृषी सभापती नाना नाकाडे, तहसीलदार प्रशांत गड्डम, गटविकास अधिकारी राजेश फाये, पोलीस निरीक्षक अमोल फडतरे उपस्थित होते.

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आढावा बैठकीत अन्न, आरोग्य, औषधी, रस्ते, शिक्षण या शासकीय कामकाजातील अधिकाऱ्यांचे कामांचे लेखाजोखा बघून अधिक उत्तम काम करण्यासाठी निर्देश दिले. तसेच तालुक्यात कमी कर्मचारी असताना सुद्धा कामकाज सुरळीत सुरू असल्याने त्यांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी ही बैठक घेतले असून लवकरच मुख्यमंत्र्यांशी बोलून रिक्त पदे भरले जातील असे सांगितले.

तसेच शासकीय दवाखान्यात व आरोग्य विभागात लागणारा औषधी साठा मागणीनुसार वेळेवर पुरवठा करण्यात येईल, तसेच खाद्यतेलामध्ये भेसळ करणारा व्यापारावर कारवाई केली जात आहेत. नुकतेच नागपूर गोल्ड स्टोरेज मध्ये धाड टाकून सव्वातीन कोटीचा तंबाखूजन्य गुटका जप्त केल्याचे घटना यावेळी सांगितले. तसेच सदर आढावा बैठकीला अनुपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार प्रशांत गड्डम यांना निर्देशही दिले. या आढावा बैठकीला तालुक्यातील शासकीय प्रशासकीय विभागातील अधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपा तालुका पदाधिकारी सह कर्मचारी उपस्थित होते.

 

विशेष

 तहसील कार्यालयातील आढावा बैठकीनंतर कोरची तालुक्यातील कोहका व बोरी येथील एबीस कंपनीकडे राजे धर्मराव बाबा आत्राम यांचा ताफा निघाला परंतु कोहका एबीस कंपनीच्या ठिकाणी गेल्यानंतर मुख्य कार्यालय बोरीच्या एबीसी कंपनीला असल्याने मंत्रीचा ताफा त्या दिशेने निघाले बोरीला पोहचल्यानंतर कंपनीच्या मुख्य दारावरूनच मंत्री धर्मराव बाबा आत्राम भेट न देता कुठलीही पाहणी न करता त्या ठिकाणाहून कुरखेडाच्या दिशेने निघाले. नेमक कंपनीत न जाण्याचे कारण येथील स्थानिक व पत्रकारांना समजले नाही.