पंचायत समिती रस्त्यावर वाकलेल झाडामुळे अपघाताला आमंत्रण; मोठी व उंच वाहने अडकतात संबंधित विभागाचा दुर्लक्ष

 

 

कोरची

कोरची येथील पंचायत समितीकडे जाणाऱ्या ग्रामीण रुग्णालयापुढील एक विशाल चिंचेचा झाड रस्त्यावर वाकल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. या मार्गावरून मोठी व उंच वाहने जाताना अडकतात मग त्यांना उलट फिरुन शासकीय आश्रमशाळेच्या पटांगणावरून पंचायत समिती विभागातकडे व गटसाधन केंद्रात जावे लागते. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे येथील शासकीय विभागातील अधिकाऱ्यांना कामामध्ये अडथळा निर्माण होत आहे.

या मार्गावर पंचायत समिती, गटसाधन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून नेहमीच वर्दळ सुरू असते. याच रस्त्यावर हे विशाल चिंचेचे मोठे झाड वाकले असल्यामुळे कधीही हे झाडं रस्त्यावर किंवा वाहनावर कोसळून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसापूर्वी पंचायत समितीमध्ये खुर्च्या सोडण्यासाठी गेलेलं एक मोठे ट्रक या झाडाममध्ये अडकून दोन ते तीन खुर्च्या तुटल्या असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या तीन ठिकाणच्या शासकीय कार्यालत विविध कामासाठी मोठे वाहने येतात परंतु वाकलेल्या झाडांमुळे अर्ध्यावरून परत जाताना दिसून येत आहेत.