महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयाला मानाचा तुरा!!

 

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमात तालुक्यातून प्रथम तर जिल्ह्यातून द्वितीय.…

 

आरमोरी

. :- महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग च्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत ”मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या स्पर्धात्मक उपक्रमात मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरी द्वारा संचालित महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय आरमोरी ही तालुक्यातून प्रथम तर जिल्ह्यातून द्वितीय आलेली आहे. विद्यालयाच्या इतिहासात प्रथमच एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. याचे जिल्ह्यातून व तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर अभियानाचे स्वरूप विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग अशा प्रकारचे होते. या सर्व निकषात विद्यालय सरस उतरली. प्रथम तालुकास्तरीय निवड समितीने मूल्यांकन केले. व्यवस्थापनातून तालुक्यातून प्रथम आल्यानंतर जिल्हा निवड समितीने मूल्यांकन केले. सर्व निकषात पात्र ठरल्याने जिल्ह्यातून द्वितिय क्रमांक प्राप्त झाला.

विद्यालयात स्थापनेपासूनच दलित मित्र संस्थापक स्व. वामनरावजी वनमाळी व स्व. मुरलीधरराव वामनरावजी वनमाळी यांचे प्रेरणेने शासनाचे विविध योजना, शैक्षणिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक उपक्रम, माजी विद्यार्थी मेळावे राबविले जातात. विद्यालयात अत्याधुनिक भौतिक सुविधा असून शासनाच्या विविध उपक्रमात विद्यालय हिरहीरीने सहभाग घेते. विद्यालयात परसबाग, बोलक्या भिंती, उत्तम प्रयोगशाळा, वर्गात भिंतीचित्र, सुसज्ज कार्यालय, नियमावली पत्रक या सुविधा उपलब्ध आहेत.

या सर्व निकषात पात्र ठरल्याने विद्यालयाला तालुका प्रथम व जिल्ह्यातून द्वितिय क्रमांक प्राप्त झालेला आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मनोहर भाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व मार्गदर्शक श्री. मनोजभाऊ वनमाळी यांनी भावना व्यक्त केली की, ” संस्थेच्या व विद्यालयाच्या इतिहासात हे अभूतपूर्व यश मिळाले आहे. आदिवासीबहुल विभागात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या यशाने खरोखरच आमचे इतिहासात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.” 

विद्यालयाचे प्राचार्य श्री. साईनाथ अद्दलवार यांनी सांगितले की हे यश सांघिक यश आहे. संस्थेचे मार्गदर्शन व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्याने हे यश संपादन झालेले आहे. विद्यालयाने स्पर्धेच्या सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करीत हे यश मिळवले आहे. आधीच नावलौकिक असलेल्या शाळेचा लौकिक वाढलेला आहे. ही संस्था व शाळेसाठी अभिमानाची बाब आहे……..