जोगीसाखरा – येथील श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखरा ही आज पर्यंत सेवाभावाची जान ठेऊन संस्था आतापर्यंत पाणी वाटप अंत्यविधी साठी आर्थिक मदत रक्तदान शिबीर गरजुना रक्ताची मदत डोळ्याची व इतर आरोग्याची शस्त्रक्रिया यांसह संस्था अनेक काय करीत असताना सभासदांच्या मुला मुलींच्या लग्न समारंभात सहभागी होऊन पळसगाव येथील रहिवासी व जोगीसाखरा संस्थेचे सभासद कविता तुळशिदास मातेरे यांचा मुलागा देवेंद्र यांच्या लग्न समारंभासाठी सामाजिक दायित्वाच्या दृष्टीने तिळाचा वाटा संस्थेनी उचलुन श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या वतीने शुभविवाहास साठी आज तेलाच्या टिनाची मदत देण्यात आली.
यावेळी श्री गुरुदेव जकास संस्थेचे सचिव गिरीधर नेवारे मुकुदम शरद मडावी लिपिक गुणवंत जांभूळे संपन चौके वनिता मातेरे उपस्थित होते.
श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था ही अडचणीत सापडलेल्या प्रत्येक सभासदाच्या सुख दुःखात सहभागी होऊन विविध मार्गाने मदत करण्यास कटिबद्ध राहुन यापूर्वी ही अनेक सभासदांना व त्यांच्या कुटुंबीयांना वेळेवर आथिर्क मदत अडी अडचणी सोडविण्याचे प्रयत्न करीत असल्याने श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे जनमानसानी कैतुक केले आहे.