मतदान जनजागृती करिता आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये PRD SPORTS ची आरुषी फटिंग तृतीय

महिलांच्या खुल्या गटात १० वर्षाची चिमुकली आरुषी ठरली आकर्षण सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

 

ब्रम्हपुरी :- उपविभागीय अधिकारी कार्यालय, व नगर परिषद ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विध्यमाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती करण्याकरीता (SVEEP) कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्र्रसंत तुकडोजी महाराज ग्राउंड येथे दिनांक 23/03/2024 रोज सकाळी 7.00 वाजता सहा. निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत खुल्या मॅरेथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे होते. सदर मॅरेथान स्पर्धेचा मार्ग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रांउड ते प्रियदर्शनि इंदिरा गांधी चौक ते पॉलिटेक्नीक कॉलेज असा होता.

करीता सदर मॅरेथॉन स्पर्धेकरीता महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी,पत्रकार, शासकीय अधिकारी व कर्मचारी,डॉक्टर्स व वैद्यकीय क्षेत्रातील इच्छुक स्पर्धक,तसेच सर्व नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन स्पर्धेत भाग घेतले.विशेष म्हणजे महिलांच्या खुल्या गटात इयत्ता ३ ऱ्या वर्गात शिकत असलेली फक्त १० वर्षाची पी.आर. डी. स्पोर्ट्स, ब्रम्हपुरी ची विद्यार्थिनी कु. आरुषी फटिंग ने तृतीय क्रमांक पटकावला त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे तर पुरुषांच्या खुल्या गटात १० वर्षाच्या अर्पित सोमनकर याने ४ था क्रमांक पटकावला मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा मेडल देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला .