सरपंच-उपसरपंच संघटनेची आरमोरी तालुका कार्यकारिणी गठीत

 

आरमोरी- येथील विश्रामगृहात आरमोरी तालुका सरपंच-उपसरपंच संघटनेची तालुका कार्यकारिणी गडचिरोली सरपंच संघटनेच्या अध्यक्षा अपर्णा राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यात अध्यक्षपदी शिवणी ग्रा. प.चे सरपंच पुरुषोत्तम दोनाडकर, उपाध्यक्ष म्हणून सौ दडमलताई( सरपंच ग्रा.पं.पळसगांव ) यांची नियुक्ती करण्यात आली. तर सचिव पदी भास्कर बोळणे (उपसरपंच ग्रा.प.वैरागड) , कोषाध्यक्ष श्यामादेवी सहारे (सरपंच ग्रा. प.देऊळगाव), कार्याध्यक्ष ईश्वरजी कुडे (सरपंच ग्रा.प. चुरमुरा) ,संघटक मिथुन जी प्रधान (सरपंच ग्रा.प.वघाळा), सहसचिव श्री मंगेश पासेवार (उपसरपंच ईंजेवारी), समिती प्रमुख सल्लागार म्हणून त्रिलोकजी गावतुरे (उपसरपंच देलनवाडी), पुरुषोत्तम कीलवले (उपसरपंच पिसेवडधा) व संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून मनोज पांचलवार( उपसरपंच ग्रा.पं . सायगाव) यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

सदर‌ कार्यक्रमाला श्री प्रविण ठेंगरी उपसरपंच कासवी,चेतन भोयर सदस्य ग्रा.पं .वघाळा,अशोक जी माकडे सदस्य ग्रा.पं.वघाळा,दिघोरे सदस्य ग्रा.प.कासवी ,बाबा नरुले उपसरपंच, मनोज जी अंबादे सदस्य ग्रा.प.देलनवाडी, प्रभा मनोज ढोरे सरपंच सांवगी,कुंदा गायकवाड सरपंच कोरेगाव , पुरुषोत्तम बावणे उपसरपंच ,चक्रधर नाकाडे सरपंच तुळशी,दिव्या देवराव मोहुर्ले उपसरपंच,अल्का योगाजी कुकुडकार सरपंच ईजेंवारी,सुरेश चांगोजी ढोरे उपसरपंच व इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.