आरमोरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधूरी सलामे यांच्यावर गुन्हा दाखल करा वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी (घनकचरा व्यवस्थापन प्रकरण)

आरमोरी,
घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट घेतांना बनावट कागदपत्र जोडल्यामूळे संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे. परंतु या सगळ्या प्रकरणात मुख्याधिकारी माधूरी सलामे सुद्धा दोषी असल्याने त्यांच्यावर सुध्दा गुन्हा दाखल करून सदर प्रकरणाची रितसर चौकशी करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतिने तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
पुढे या निवेदनात म्हटले आहे की, सदर कंत्राट देतांना कंत्राटदाराच्या मुळ दस्तावेजाची पडताळणी न करता मुख्याधिका-यांनी कसे काय कंत्राट दिले? मूळ कागदपत्राची पडताळणी कां केली नाही?एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२२ पर्यंतचे देयके देतांना सुध्दा संबंधित कंपनीने कामगाराचे कपात केलेली भविष्य निर्वाह निधी सुध्दा भरलेली नाही तरी सुध्दा कंपनीचे देयके कसे दिले? कामगारांच्या बॅंक खात्यात मानधन जमा करण्याचे शासनाचे आदेश असतांना सुध्दा कंत्राटदाराने रोख स्वरुपात कामगारांना मानधन दिले ही गंभीर बाब मुख्याधिका-यांच्या लक्षात येऊन सुध्दा त्यांनी डोळेझाक कां केली? यावरून सरळ दिसून येते की, मुख्याधिका-यांचे सुध्दा हात बरबटलेले आहेत व ह्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समजते, त्यामूळे सरळ स्पष्ट होते की, कंत्राटदार जेवढे दोषी आहेत त्याहून जास्त दोषी मुख्याधिकारी आहेत, त्यामूळे मुख्याधिका-यांवर व संबंधित अधिका-यांवर गुन्हा दाखल करून सदर प्रकरणाची योग्य रितसर चौकशी करण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतिने तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा सुध्दा देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका प्रज्ञा निमगडे, तालुकाध्यक्ष राजेंद्र गेडाम, उपाध्यक्ष विकास भैसारे,सदस्य संध्या रामटेके, वैशाली रामटेके, किरण रामटेके व आदि उपस्थित होते.