एक पणती व्यसनमुक्ती साठी

देशातील तरूण पिढी व्यसनमुक्त राहावे, युवकांनी व्यसनापासून दूर राहावे म्हणून या दिवाळीत एक पणती व्यसनमुक्ती लावून स्वतःचे व राष्ट्राचे हित जोपासाव, एक पणती लाखो पणत्यांच्या प्रज्वलित करू शकते, आज अनेक तरुण बांधव व्यसनाच्या आहारी जात आहे, या व्यसनाने आपला जीव गमावू शकतो, आपल्या कुटुंबात आपले अस्तित्व खूप मोठे आहे, आज आपल्या देशात नवीन पिढीत प्रत्येकाला साधारण एक किंवा दोनच अपत्य आहे, त्यात एक मुलगा व एक मुलगी, मुलांचे व्यसनाकडील वाढते प्रमाण पाहता होणारा कर्करोग सारखा महाभयंकर आजार आपला जीव घेवू शकतो, आपले अस्तित्व ओळखून सर्व बांधवांनी या दिवाळीत एक पणती व्यसनमुक्ती साठी लावावी व व्यसन मुक्त होण्यासाठी पुर्णविराम द्यावे, नवतरुण युवकांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते, त्याना योग्य वळण लावणे कुटुंबात प्रमाणे शिक्षण व समाज महत्वाची भूमिका बजावत असतात, सोशल मीडियाच्या जाहिराती व संगत गुणांमुळे मुले बिघडतात, अनेक सिने अभिनेत्याच्या मुलांचे प्रकार ऐकून आहात, भारतात तंबाखू सेवनाचे प्रमाण अधिक आहे, २०१२ साली महाराष्ट्र शासनाने गुटखाबंदी लागू केली, प्रत्येक सिगरेट जीवनातील सात मिनिटे कमी करते, व्यसन असणं मानसिक, शारीरिक आजार आहे, मादक पदार्थांची नशा चढते, मेंदूत घडणाऱ्या रासायनिक बदलामुळे आपल्या मेंदूतील आनंद ( reward centre) देणाऱ्या केंद्रामुळे ती नशा पुन्हा करून बघावी असे वाटते आणि हळूहळू मादक पदार्थ घेण्याची सवय लागते, तर अनेक शारीरिक आणि मानसिक लक्षणे (withdrawal symptoms) निर्माण होतात, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना दिवाळी निरोगी व मंगल मय जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना, शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा । शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥*