दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, तालुका कोरचीची कार्यकारिणी गठीत.

 

कोरची. दि. 2/12/23

येथील धम्मभूमी च्या आवारात दि. 2/12/23 ला बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया ची तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

यावेळी नागपूर विभागीय अध्यक्ष तथा राज्य संघटक विजय बन्सोड, वडसा विभागीय उपाध्यक्ष अशोक इंदूरकर, जिल्हा सल्लागार गडचिरोली इंजि. नरेश मेश्राम, ज्योती राऊत कुरखेडा शहर शाखा अध्यक्ष, कुंदा सहारे संस्कार प्रमुख कुरखेडा ईत्यादी मान्यवर उपस्थित होते. तर तालुक्यातील जवळपास 150 महीला- पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

सर्वप्रथम महाकारूनिक तथागत गौतम बुद्ध व प. पु. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पमाला अर्पण करून त्रीशरण पंचशील घेण्यात आले.

 

*दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया* ची *स्थापना,आवश्यकता व महत्व* यावर नागपूर विभागीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य संघटक *आयु.विजय बन्सोड* यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित धम्म बंधु-भगिणीं मधून *कोरची तालुका शाखा* पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

एकमताने निवडण्यात आलेली कार्यकारिणीमध्ये तालुका अध्यक्ष पदावर किशोर राधेश्याम साखरे , तालुका सचिव म्हणून चंद्रशेखर प्रताप वालदे ,

तालुका कार्याध्यक्ष – चंद्रशेखर बळीराम अंबादे , कोषाध्यक्ष – रमेश बाबुराव सहारे , उपाध्यक्ष – महेश रतिराम लाडे , उपाध्यक्षा – छाया मन्साराम अंबादे , सहसचिव – चेतन मोरेश्वर कराडे , मुख्य संघटक – चंद्रशेखर बीरसिंग उमरे आणि अनिल मयाराम नंदेश्वर , तालुका प्रसिद्धी प्रमुख- राहुल मुन्शीलाल अंबादे व प्रशांत हिवराज कराडे, तालुका प्रवक्ता डॉ. विनोद तुळशीराम चहारे महिला संघटक- छाया बालक साखरे , सल्लागार- शालीक कराडे, देवराव गजभिये, अशोक कराडे, जिवन भैसारे, तुलसी अंबादे , व सदस्य म्हणून नकुल सहारे, सुदाराम सहारे, माणिक राऊत, अपर्णा साखरे, मंदा उके म्हणुन नियुक्त करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर अंबादे सर , प्रस्तावना रमेश सहारे सर व आभार किशोर साखरे सर यांनी मानले.