तालुका स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा

 

 

 

कोरची:-

 

तालुका स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा विचार कार्यक्रमात श्रीराम हायस्कुल कोरची तालुक्यात ठरली प्रथम तर युवास्पंधन हायस्कुल भिमपुर द्वितीय क्रमांक पटकावला.तालुक्यातील एकुण १२ हायस्कुल सहभागी असुन बेतकाठी क्लस्टर आणी कोरची क्लस्टर या दोन क्लस्टर मधुन चार शाळा सहभागी होत्या प्रथम सादरीकरन प्रत्येक शाळेनी प्रकल्पाचे सादरीकरण,दुसराटप्पा पथनाट्ये व गीतगायन सादर करण्यात आले,कार्यक्रमाचे अध्यक्ष अमीत दास गट शिक्षणाधिकारी प.स.कोरची यांनी तंबाखुमुक्त संकल्प शाळा करण्यासाठी शिक्षक विद्यार्थी व इतर पदाधिकारी वेसन करू नये सोबत 11 निकष पूर्ण असेल तरच तंबाखुमुक्त संकल्प शाळा मानल्या जातो संपूर्ण विद्यार्थी शिक्षक मिळून समाज वेसनमुक्त करूया असे विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून सांगितले.परीक्षक विनोद भजने ज्योती ताई जिवन भैसारे,आयोजक मुक्तीपत्रक अभियान कोरची निळा किन्नाके तालुका संघटक सहभागी शिक्षक आर.एच. वलथरे,शितल जांभूळकर मॅडम,कैलास बोरकर तंबाखुमुक्त शाळा नोडल आफिसर बेतकाठी के एम लंजे मॅडम,विजय कोंटगले,मुक्तीपथ टिम विनोद टेभुर्णे,मोहन बुद्धे,आणी उपस्थित संपुर्ण विद्यार्थी याचा सक्रीय सहभाग घेतला कार्यक्रमाचे आभार दिनेश औरासे यांनी मानले.