मराठी विज्ञान परिषद आरमोरी विभाग तर्फे वृक्षारोपण

 

आरमोरी तहसील कार्यालय कडील क्रिकेट ग्राउंडच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी म. वि. प. अध्यक्ष प्रा. डॉ. के. टी. किरणापुरे , उपाध्यक्ष हरेश बावनकर, दुर्वास बुद्धे , सुरेश चिलबूले , खटुजी भांडेकर , द्रोणाचार्य सातपुते उपस्थित होते. कडुनिंब , आवळा , करंजी रिटा , बेहडा , बेल , जांभुळ , बांबू , चाफा आदी प्रजातीच्या झाडांच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली. डॉ. के. टी. किरणापुरे यांनी मार्गदर्शन करताना पर्यावरण टिकेल तर जिवसृष्टी टिकेल, याकरिता स्वत:साठी व भावी पिढीसाठी जास्तीत जास्त झाडे लावावीत. आपण सर्व मिळून वृक्ष लागवड करून अनमोल वसूंधरेची शक्ति व सौंदर्य वाढवण्याचा संकल्प करूया असे सांगितले. वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रजनी किरणापुरे , चेतन ठाकरे , बालकदास कोटरंगे ,दुलाराम किरणापुरे , सतिश धात्रक आदींनी मोलाचे सहकार्य केले.