आरमोरीत प्रकाश चषकाचे मोठ्या थाटात उदघाटन
आरमोरी-खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात खेळाचे खूप महत्त्व आहे.खेळ हे मानवी जीवनाचे प्रतिबिंब असून, खेळ माणसाचे चारित्र्य आणि व्यक्तिमत्व घडवण्यास मदत करतात.असे प्रतिपादन सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी केले.
युवामंच व प्रकाश चषक आयोजन समिती आरमोरी यांच्या संयुक्त सौजन्याने आयोजित विकास चषक भव्य टेनिस बॉल रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा आरमोरी येथील क्रीडा संकुलामध्ये घेण्यात येत असून सदर स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाला दीपप्रज्वलक म्हणून गडचिरोली जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार कृष्णा गजबे तर प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी न.प.चे नगराध्यक्ष पवन नारनवरे, किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. सचीन खोब्रागडे, आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक,भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, प्रा. गंगाधर जुआरे,भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, भाजपचे जेष्ठ कार्यकर्तेश्रीहरी कोपुलवार, नंदू पेट्टेवार, पं.स. च्या माजी सभापती नीता ढोरे, न.प.चे बांधकाम सभापती सागर मने, आरोग्य सभापती भारत बावणथडे, महिला व बालकल्याण सभापती सुनीता चांदेवार, नगरसेविका सुनीता मने, पंढरीनाथ नखाते,गुरुनाथ ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना अरविंद सावकार म्हणाले की,आज जगभरात क्रीडा प्रतिभेने देशाचे नाव प्रकाशमान करणारे बहुतांश खेळाडू हे अगदी सामान्य कुटुंबातील आणि ग्रामीण भागातील आहेत.आपल्या आदिवासी जिल्ह्यातही उत्तम खेळाडू असून, त्यांच्या खेळांना व कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रकाशभाऊंच्या मार्गदर्शनात युवामंचच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश चषक क्रिकेट स्पर्धेचे दुसरे पर्व सुरू केले.हे त्यांचे कार्य अभिनंदनास पात्र आहे.
अध्यस्थानावरून बोलतांना गजबे म्हणाले की,खेळामुळे व्यक्तींमध्ये शिस्त, चिकाटी आणि खिलाडूवृत्ती यांसारखी महत्त्वाची वैशिष्ट्ये विकसित करण्यात मदत होऊ शकते. खेळ व्यक्तींना निष्पक्षता, प्रामाणिकपणा आणि आदर, नैतिक वर्तन आणि मूल्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व शिकवू शकतात.तर दीपप्रज्वलक प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांनी क्रिकेटपटूनी खेळीमेळीच्या वातावरणात खेळ करून ऋणानुबंधन जोपासावे असे आवाहन केले. तर प्रमुख अतिथी डाँ.सचिन खोब्रागडे यांनी,खेळ हा माणसाच्या जीवनाला मिळालेला डाँक्टर असून प्रकाश चषक म्हणजे आरमोरीकरांसाठी प्रकाश पर्वणी असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.
सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.व सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाश चषक स्पर्धेचे उदघाटन करण्यात येऊन क्रिकेट स्पर्धा सुरू करण्यात आल्या. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून वडसाचे व्यापारी राजू जेठाणी, सागर नाकाडे व श्रीकांत नागीलवार यांना पोरेड्डीवार साहेबांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन अक्षय हेमके,प्रास्ताविक विलास पारधी तर आभार गोविंदा भोयर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवामंचचे टिंकू बोडे,नंदू नाकतोडे, स्वप्नील कारकुरवार,पवन कोकोडे,झापे साहेब, सुरज कारकुरवार, अमित उरकुडे, श्रेयस सोमनकर,अतुल नखाते, कुणाल पिल्लारे, आशुतोश चव्हाण, हेमंत कोपूलवार, हितेश कोपुलवार, केतन घोसे, खुशाल सहारे, जितेंद्र ठाकरे, मिथुन मडावी, कृष्णा लाड, निलरतन मंडल ,सचिन मेश्राम, सौरभ श्रीरामे, शुभम मुरमुरवार, शुभम निंबेकर, नितीन गोंदोडे ,तोपिक खान, युगल सामृतवार, नंदू नाकतोडे हिमालय मातेरे, अमोल खेडकर ,प्रसाद साळवे, दत्तू राठोड, शैलेश चिंचोलकर,संजय सोनटक्के,अमित राठोड तसेच प्रकाश चषक आयोजन समितीच्या पदाधिका-यांनी अथक परिश्रम घेतले.