तथागत बुद्ध विहार येथे जागतिक महिला दिन संपन्न

 

 

 

आरमोरी….

स्थानिक तथागत बुद्ध विहार येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी शुशिलाबाई कोल्हटकर होत्या तर उद्घाटक म्हणून मिनाक्षिताई गेडाम होत्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंजुशाताई दोणाडकर आणि प्रमुख अतिथी स्थानी वर्षाताई खोब्रागडे,कल्पना ताई ठवरे ज्योतिताई म्हस्के ,संगीता ताई, रेवतकर ,विद्याताई चौधरी ,आदी उपस्थित होत्या,

सर्वप्रथम माता जिजाऊ,माता रमाई यांच्या प्रतिमेला माल्यारपण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या मार्गदर्शन करताना मंजुषाताई दोनाडकर यांनी संविधान आणि संविधानाच्या माध्यमातून महीला ना मिळालेल्या अधिकाराचा आपल्या जीवनात कसा उपयोग करता येईल आणि महिलांची आर्थिक मानसिक आणि सामाजिक प्रगती कशी करता येईल यासाठी सर्व महिलांनी प्रयत्न करावे अन्यायाला बळी पडू नये त्याचा प्रतिकार करावा आहे मत याप्रसंगी व्यक्त केले.

प्रमुख अतिथी स्थानावरून बोलताना ज्या रणरागिणी नी महिलांसाठी केले त्यांचे उपकार त्यांचा वैचारिक वारसा चालवून केले पाहिजे आहे मत व्यक्त केलं. याप्रसंगी कुंदाताई मेश्राम यांनी अप्रतिम कविता सादर केली महिला दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ समाजसेविका आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सौ.शालिनीताई गेडाम यांचा वाढदिवस आणि सन्मान सोहळा साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.भारती मेश्राम यांनी केले तर आभार वंदना शेंडे यांनी मानले,

.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सपना खोब्रागडे अल्का मेश्रा म,शीतल खोब्रागडे,भावना खोब्रागडे,सुवरणा वासनिक ,पुष्पा रामटेके,शशिकला खोब्रागडे,अनुराधा रामटेके,आशाताई मेश्राम, कुंदाताई मेश्राम आदींनी अथक परिश्रम घेतले.