शिक्षक शाळेत न आल्यास विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय-शाळा व्यवस्थापन समितीचा प्रश्न

विद्यार्थ्यांना संप स्थळी आणायचे का?

आरमोरी:-
दि.14 मार्चपासून सुरू असलेल्या राज्यव्यापी बेमुदत आंदोलन सर्व कर्मचारी वर्ग यांनी सुरू केलेला आहे त्यामुळे सर्व सेवा ठप्प पडलेल्या आहेत.अत्यावश्यक सेवा,शैक्षणिक क्षेत्रात अश्या अनेक ठिकाणी सर्वसामान्य जनतेवर अन्याय होत आहे.एकच मिशन-जुनी पेन्शन या नावाने सर्व क्षेत्र कोलमडले आहेत त्यात शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले शिक्षक यांनी राज्यव्यापी आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आणि शिक्षक सरकारवर अगोदरच नाराज आहेत की अनेक अशैक्षणिक कामात राबवून शिक्षकांची पिळवणूक करतात त्यात या संपामुळे शिक्षक संपात सहभागी असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे तरी शिक्षक दि.18 मार्चला पूर्ववत न आल्यास विद्यार्थ्यांना संपाच्या ठिकाणी नेणार असे संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून इशारा जि. प.मराठी शाळा रामपूर चक येथील शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे.
निवेदन देताना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रुमदेव सहारे,लालाजी बावणे,हेमराज उईके,अशोक मोहूर्ले, सुधीर माकडे,कुश वाटगुरे, गुरुदेव सरपे व पालक उपस्थित होते.