आरमोरी तालुक्यात शाळा व महसुल प्रशासनाचे पुढाकाराने विदर्यार्थ्यांना एका दिवसात मिळणार जातीचे दाखले

आरमोरी :- आरमोरी तालुक्यातील वर्ग 5 ते 7 तसेच वर्ग 8 ते 10 मध्ये शिकत असलेल्या अनुसुचीत जाती,

 

अनुसुचीत जमाती व इतर प्रवर्गातील ज्या विदयार्थ्यांनी अजुनपर्यंत जातीचे दाखले काढले नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना जातीचे दाखले निर्गमीत करण्याकरीता महसुल प्रशासन आरमोरी यांचेकडुन मोहीम उघडली असुन या करीता विशेष शिबीरांचे आयोजन करुन नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहे. विदयार्थ्यांना शाळेतच एकाच दिवशी जातीचे दाखले मिळणार आहे. जातीचे दाखले काढण्यासाठी लागणारी दिरंगाई टाळण्यासाठी शिबीराचे ठिकाणी उपविभागीय अधिकारी हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. पालकांनी जातीचे दाखल्यासाठी लागणा-या कागदपत्राची काळजी करु नये. जातीचे दाखल्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे रिनंबरींग पर्चा, P1 अधिकार अभिलेख पंजी, गाव नमुना आठ, बंदोबस्त मिसल, शेतीचा 7/12, रहीवासी दाखले प्रशासनाकडुनच जमा करण्यात येणार आहे. करीता याबाबतीत विदर्यार्थ्यांच्या पालकांनी आपले संबधित तलाठी व ग्रामसेवक यांचेशी संपर्क साधुन त्यांचेकडुन आवश्यक दाखले प्राप्त करुन संबधित शाळेत आधारकार्डसह जमा करावे असे आवाहन ओमकार पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आरमोरी यांनी केले आहे.