पळसगाव अरततोंडी पहाडी गडांवर महाशिवरात्री निमित्त आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन

 

 

श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखरा व वनविकास महामंडळ देसाईगंज यांचा उपक्रम

 

जोगीसाखरा – दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त आरमोरी तालुक्यातील पळसगाव अरतोडी महादेव गडांवर येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाराष्ट्र शासन आदिवासी सेवा संस्था राज्य पुरस्कृत श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखरा व वनविकास महामंडळ देसाईगंज यांच्या संयुक्त विद्यमाने पाणपोई सुरू करण्यात आले या पाणपोईचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार किष्णाभाऊ गजबे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी उपजिल्हाधिकारी कृष्णा रेड्डी आपत्ती व्यवस्थापन गडचिरोली आरमोरी तहशिलदार श्रीहरी माने देसाईगंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय जगताप देसाईगंज वनविकास महामंडळ वनपरिक्षेत्र अधिकारी सरीता विधाते श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम देवस्थान कमेटीचे अध्यक्ष पुंडलिक घोडाम श्री गुरुदेव जंगल कामगार संस्थेचे उपाध्यक्ष शेषराव कुमरे उपाध्यक्ष श्रीराम ठाकरे संस्थेचे सचिव गिरीधर नेवारे धनपाल आशीष बायरकार धनपाल अनिता लटाये संचालक सुरेश मेश्राम यादोराव कहालकर धमा मरापा धमा दिघोरे दामोदर मानकर गोपाल खरकाटे शेषराव काटेगे उज्वलाताई मडावी गोपिकाबाई कोल्हे वनरक्षक निरंजन चौधरी वनरक्षक मनिषा कदम वनरक्षक पंढरी तेलंगे वनरक्षक सुकदेव पवार मुकुदम शरद मडावी लिपिक गुणवंत जाभुळे दिवाकर राऊत गणेश मातेरे सहसचिव रमेश वाढई रामक्रिष्ण ढोरे रामजी मानकर हिरालाल कानतोडे कवडुजी मातेरे नरहरी पिलारे रेवनाथ चवारे दुर्वास नाईक तुळशीदास बाडे अशोक भोयर देवराव उरकुडे पुराणिक सपन चौके यांसह मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.